SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात


अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री  (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय वेळेनुसार सकाळी 5.32 मिनिटांनी पहिल्यांदा 4 सामान्य नागरिकांना अंतराळात पाठवले आहे. हे 4 टूरिस्ट 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत 575 उंचीवर राहतील. SpaceX launches 4 amateurs on private Earth circling trip


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री  (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय वेळेनुसार सकाळी 5.32 मिनिटांनी पहिल्यांदा 4 सामान्य नागरिकांना अंतराळात पाठवले आहे. हे 4 टूरिस्ट 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत 575 उंचीवर राहतील.

हे पर्यटक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 357 मैल (575 किलोमीटर)  उंचीवर प्रवास करत आहेत. नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेट लाँच करण्यात आले. ही घटना जगभरातील अंतराळ प्रवासात रूची असणाऱ्यांमध्ये कुतूहलाचे कारण ठरले आहे. या मिशननंतर फक्त सरकारीद्वारे प्रायोजित अंतराळवीरांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांसाठीही मानव अंतराळयानाच्या एका युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. 2009 मध्ये शास्त्रज्ञ हबल दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी 541 किलोमीटर उंचीवर गेले होते.



असा निवडला क्रू

2009 नंतर या वर्षी पहिल्यांदा माणूस एवढ्या उंचीवर गेला आहे. SpaceX चे ड्रॅगन कॅप्सुल लिफ्टऑफच्या 12 मिनिटांनंतर फाल्कन 9 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात वेगळे झाले. यानंतर कंपनीने सूचित केले की, सिव्हिलियन क्रूला यशस्वीरीत्या कक्षेत लाँच करण्यात आले आहे. या मोहिमेत 38 वर्षीय अब्जाधीश जारेड इसाकमेन यांनी फंडिंग केली आहे. ते शिफ्ट 4 पेमेंटस इंकचे सीईओ आहेत. ते स्पेसफ्लाइट मिशनचे कमांडरही आहेत. त्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून इतर क्रू स्वत: निवडला.

कॅन्सर सर्व्हायव्हरही मोहिमेचा सदस्य

या मिशन उद्देश अमेरिकन सेंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे आहे. मिशनला लीड करणारे इसाकमन यामाध्यमातून 20 कोटी डॉलर गोळा करू इच्छितात, यातील अर्धी रक्कम ते स्वत: देतील. या मोहिमेच्या निधीतून कर्करोगाविरुद्ध जागरूकता अभियानही चालवले जाईल. या मोहिमेतील एक सदस्यही कॅन्सर सर्व्हायव्हर आहे.

SpaceX launches 4 amateurs on private Earth circling trip

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात