ब्रम्हपुत्रा नदीचा पूर रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रम्हपुत्रेसारख्या महाप्रचंड नदीचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यासाठी तसेच पुर व्यवस्थापन करण्यासाठी आयआयटी, गुवाहाटी आणि ब्रम्हपुत्रा बोर्ड एकत्र आले आहेत.flood management is with help of IIT in Assam

त्यानुसार, आयआयटी, गुवाहाटी आणि ब्रम्हपुत्रा बोर्ड एकत्रितरित्या नदीच्या समस्या सोडवितील. त्याचप्रमाणे, लोकांच्या फायद्यासाठी नदीचा अधिक प्रभावी वापर कसा करायचा, यावरही काम करतील. उभयंतांत प्रयोगात्मक, संगणकीय सहकार्य केले जाईल. त्यासाठी, आयआयटीचे विद्यार्थी व ब्रम्हपुत्रा बोर्डाचे अधिकारीही परस्परांत चर्चा करतील.



आयआयटी, गुवाहाटीचे संचालक टी.जी. सितारामन म्हणाले, की ब्रम्हपुत्रासारख्या गुंतागुंतीच्या नदीचे व्यवस्थापन शिक्षणसंस्था आणि उद्योगांच्या परस्परसहकार्यातूनच शक्य आहे. त्या दृष्टिने आज एक पाऊल टाकले.

आयआयटी आणि ब्रम्हपुत्रा बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर पूर्व जल आणि संबंधित संस्था (नेहारी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे, संशोधनासह नदीखोरे, पूर व नदीकाठ व्यवस्थापनाच्या क्षेत्रात समन्वय साधणे शक्य होईल.

आसामची वरदायिनी असलेली ब्रम्हपुत्रा ही देशातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे. मात्र या नदील जवळपास दरवर्षी मोठा महापूर येतो. त्या महापुरात जीवीत व मालमत्तेचे अफाट नुकसान होते. ते कमी करण्यासाठी या योजनेतून प्रयत्न केले जाणार आहेत.

flood management is with help of IIT in Assam

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात