उत्तराखंडच्या चमोली हिमकडा दुर्घटनेतील 70 मृतदेह हाती ; बेपत्ता 134 जणांचा शोध सुरु

वृत्तसंस्था

ऋषिकेश : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन धरण परिसरातून आज आणखी दोन मृतदेह काढण्यात आले. त्यामुळे बळींची संख्या 70 झाली आहे. 134 जण अजूनही बेपत्ता आहेत. 70 bodies recovered from Chamoli glacier accident in Uttarakhand

श्रीनगर चौरस आणि किर्तीनगर येथून प्रत्येकी एक मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे बळींची संख्या 70 झाली आहे. त्याशिवाय 29 मृत शरीराचे अवयव ही हाती लागले आहेत.चमोली जिल्ह्यात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी शोध मोहिमेत भाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तपोवनच्या जोशी मठ परिसरात हिमनदीचा एक हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला होता. त्यामुळे धौलीगंगा नदीला आलेल्या पुरात तपोवन धरण, बोगदा, घरे पूर्णपणे भुईसपाट झाली होती. अनेक जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध विविध मार्गाने सुरक्षा पथकाने सुरु ठेवला आहे. ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या बोगदा 2 मध्ये बचावकार्य राबविण्यात आले असून अजूनही शोध मोहीम सुरु आहे.

70 bodies recovered from Chamoli glacier accident in Uttarakhand

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*