सोशल मिडीयावरील न्यायाधीशांविरुद्धची पोस्ट पडली महागात; आंध्र प्रदेशात पाच जणांना अटक


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील न्यायाधीशांविरुद्धच्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली.सीबीआयने अटक केलेल्यांपैकी तीन जणांना कालच ताब्यात घेण्यात आले होते, तर दोन जणांना आज अटक केली.five arrested for social media post

पट्टापू आदर्श आणि लवनुरू सांबा शिव रेड्डी अशी या दोघांची नावे आहेत. यापूर्वी धामी रेड्डी कोंडा रेड्डी, पामुला सुधीर आणि लिंगारेड्डी राजशेखर रेड्डी या तिघांवर कारवाई करण्यात आली होती,कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश जेव्हा धमकी मिळत असल्याची तक्रार करतात तेव्हा सीबीआय आणि आयबी कारवाई करत नाहीत.त्यांच्या तक्रारीकडे लक्षही देत नाहीत, अशी टिपणी सरन्यायाधीश ए. व्ही. रमण यांनी केली होती. त्यानंतरच सीबीआयने ही कारवाई केली आहे.न्यायाधीशांच्या सुरक्षिततेसंबंधीची एक याचिकाही प्रलंबित आहे. त्याबाबतही एका आठवड्यात उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे.

five arrested for social media post

महत्तवाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण