कोरोनाचे लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात उपलब्ध, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल ; फक्त मोबाईलवरुन पाठवावा लागेल संदेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देश -विदेशातील प्रवाशांना प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखवण्याची गरज भासते. भारतातील अनेक राज्यांनीही त्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान, लस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले आहे.Corona vaccination certificate available in seconds, available on WhatsApp; All you have to do is send a message from your mobile

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले की, आता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र काही सेकंदात व्हॉट्सअॅपद्वारे मिळू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे कोविन पोर्टल किंवा अॅपवरून लस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना या सुविधा मिळणार आहेत.



याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ज्या व्यक्तीला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे त्याला त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाचा संदेश पाठवावा लागेल. यानंतर, लस प्रमाणपत्र काही सेकंदात त्याला पाठवले जाईल. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सरकारच्या या अतिजलद सेवेचे वर्णन सामान्य माणसासाठी एक उत्तम निर्णय म्हणून केले आहे.

नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी येईल

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, +91 9013151515 हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. यानंतर, covid certificate , असे लिहून वरील क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल. ज्या क्रमांकावरून लसीकरणासाठी नोंदणी केली त्यावर तुम्हाला OTP येईल. तो या नंबरच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेज बॉक्समध्ये लिहून परत पाठवायचा आहे. यानंतर, कोविड प्रमाणपत्र काही सेकंदात येईल.

काँग्रेसचे खासदर शशी थरूर यांनीही केली स्तुती

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. विशेष म्हणजे प्रमाणपत्र कसे मिळवायचे याची प्रक्रियाही सांगितली. जेव्हा सरकारने कोणतेही चांगले काम केले तेव्हा मी नेहमीच त्या कामाचे कौतुक केले आहे.

कोविन वर टीका करत असल्याने मी म्हणेन की सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एका क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचा आहे आणि तुम्हाला ते प्रमाणपत्र काही वेळातच मिळेल, असे थरूर म्हणाले.

Corona vaccination certificate available in seconds, available on WhatsApp; All you have to do is send a message from your mobile

महत्तवाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात