ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!


ममता बॅनर्जींना दिल्लीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घ्यायची आहे. त्यासाठी त्या तृणमूल काँग्रेसची संघटना पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या टक्कर भाजपशी घेत आहेत, पण political space काँग्रेसची खात आहेत. भाजपशी टक्कर घेण्याचा त्यांचा इरादा पक्का आहे. प्रयत्न प्रामाणिक आहेत.सकाळी विरोधकांच्या ब्रेक फास्ट बैठकीला आपले खासदार पाठवून देऊन दुपारी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या त्या भेटी घेत बसल्या नाहीत.Mamata Banerjee trying to expand her TMC beyond West Bengal in Assam and Tripura


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 सालची लोकसभेची निवडणुका फार सिरियसली घेतलेली दिसते आहे. यासाठी त्यांनी चालविलेली तयारी फक्त perception level वर दिसत नाही, तर कुठेतरी प्रत्यक्ष जमिनीवर तृणमूळ काँग्रेसची संघटना वाढविण्यासाठी त्या प्रयत्न करताना दिसत आहेत.

ममतांनी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत येऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ममतांनी स्वतःला विश्वासू वाटणाऱ्या नेत्यांच्या भेटी
घेतल्या. पाच दिवसांमध्ये त्यांनी दिल्लीत राजकीय बांधणी करण्याचा सुरुवातीचा प्रयत्न केला. दिल्लीत शेवटच्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाच प्रकट केली. दर दोन महिन्यांनी दिल्लीत येऊन राजकीय बांधणी करणार असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले.



पण माध्यमे ज्या अर्थाने विरोधकांची “मोट बांधणे” म्हणतात तेवढ्यापुरते मर्यादित राहायला ममतांनी नकार दिलेला दिसतो आहे. उलट दिल्लीत विरोधकांची मोट बांधताना त्या आपल्या तृणमूल काँग्रेसची संघटना पूर्वेकडच्या राज्यांमध्ये मजबूत करण्याच्या पाठीमागे लागलेल्या दिसत आहेत. यासाठी त्यांनी आसाममध्ये अखिल गोगोई या नेत्याला हाताशी धरायचे ठरवलेले दिसते. त्याचबरोबर आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना त्रिपुरामध्ये लक्ष घालायला सांगितले आहे. त्रिपुराची निवडणूक विधानसभा निवडणूक 2023 च्या फेब्रुवारीत होणार आहे. परंतु त्या छोट्या राज्यातही तृणमूल काँग्रेसची संघटना मजबूत करण्याचा ममता बॅनर्जींचा इरादा दिसतो आहे.

पश्चिम बंगाल मधल्या “राजकीय स्टाईल”ने ममतांच्या तृणमूळ काँग्रेसने त्रिपुरामध्ये धडक मारली आहे. तिथे सुरुवातीलाच भाजप कार्यकर्त्यांबरोबर तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हिंसक झपड झाली आहे. पश्चिम बंगाल मधून गेलेले तृणमूळचे कार्यकर्ते तिथे जखमी झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हल्ले केले_ असा दावा करत खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काल त्रिपुराच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे धरले. मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या सरकारचे दिवस भरले आहेत, अशी घोषणाही त्यांनी तेथे करून टाकली.

त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यात तृणमूल काँग्रेसची संघटना मजबूत करून ममता बॅनर्जी काय साध्य करणार…?? त्रिपूरातून रातून लोकसभेच्या अशा कितीशा जागा त्यांना मिळणार…?? असा खूळचट प्रश्न काहीजण विचारू शकतात. परंतु येथे एक लक्षात घेतले पाहिजे, की त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यात ममतांनी तृणमूल काँग्रेसचे अस्तित्व जरी दाखवले तरी पश्चिम बंगाल सोडून इतर राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस पसरत आहे हा राजकीय संदेश देशभर देण्यात त्या कसूर करणार नाहीत. त्याच बरोबर त्या आसाममध्येही राजकीय हातपाय पसरत आहेत. यातला राजकीय संदेश त्रिपुरापेक्षा अधिक मोठा ठरणार आहे. नेमके हेच साध्य करण्याचा ममता बॅनर्जी यांचा मुख्य इरादा दिसतो आहे.

ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये CAA विरोधी आंदोलनात राष्ट्रीय तपास संस्थेने NIA ज्याला अटक केली परंतु सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार त्याला सोडावे लागले, त्या अखिल गोगई याला हाताशी धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. अखिल गोगई शिवसागरचा अपक्ष आमदार आहे. त्यांचा रायजोर नावाचा पक्ष आहे. रायजोर म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पक्ष.

ममता बॅनर्जी यांनी अखिल गोगोई यांना खुली ऑफर दिली आहे. रायजोर पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन करा आणि आसामच्या तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. ही ती ऑफर आहे. याचा अर्थ असा की ममता बॅनर्जी आसाममध्ये अखिल गोगई यांच्यासारख्या कट्टर भाजपविरोधी नेत्याला आपल्या पक्षात घेऊन आसाममध्ये नवा चेहरा उभा करू पाहात आहेत. यातून पक्ष संघटनेची बांधणी करण्यासाठी आक्रमक नेताही मिळवू पाहत आहेत.

नेमकी खेळी काय…??

परंतु या सगळ्यात ममता बॅनर्जी नेमक्या आव्हान कोणाला देत आहेत…?? हे इथे नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे. आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत हे खरे आहे. ममता बॅनर्जींचे राजकीय टार्गेट भाजप आहे हे देखील तितकेच खरे आहे. परंतु तृणमूळ काँग्रेसची पक्षसंघटना आसाम आणि त्रिपुरा तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाढवताना त्या political space नेमकी कोणाची घेणार आहेत…??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपशी उभा दावा साधताना त्यांनी मूळ काँग्रेस पक्षाची सर्व political space खाऊन टाकली. भाजपला त्यांनी पराभूत केले, हे तर खरेच. परंतु त्याही पेक्षा त्यांनी काँग्रेसचे नामोनिशाण पश्चिम बंगालमधून मिटवून टाकले. ही राजकीय चाल काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येते काय…??

ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राहुल गांधी यांचे कान उभे राहिले. ममता बॅनर्जी या विरोधकांची मोट बांधत आहेत हे पाहून तेदेखील विरोधकांची एकजूट साधण्यासाठी पुढे आले. संसदेच्या अधिवेशनाचे निमित्त त्यांना मिळाले. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले. कारण द्रमूक सारखा मोठा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. पण त्याच वेळी मायावतींचा बहुजन समाज पक्ष, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हे राहुल गांधी यांचे नेतृत्व मानण्यास तयार दिसत नाहीत. त्यांच्या समवेत ते आंदोलनात सहभागी होत नाहीत हे जंतर मंतरवर दिसून आले. उलट तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी विरोधकांमध्ये राहून स्वतःची स्वतंत्र चूल मांडली आहे. संसदेच्या गेल्या आठवड्याच्या अधिवेशनात हे दिसले.

या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची स्वतःची तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसला political replacement ठरू शकेल हे दाखविण्याची खेळी त्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये करताना दिसत आहेत. त्या ओरिसातही राजकीय हात पाय पसरू इच्छितात. तेथेही एखाद्या प्रभावी नेता त्यांच्या पक्षात आला तर त्यांना हवा आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडून अनेक नेत्यांनी आपल्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेतल्या. यात ममता बॅनर्जी देखील आल्या. परंतु त्यांची महत्त्वाकांक्षा त्यापुढची आहे. ती साध्य करून घेण्यासाठी त्या काँग्रेसची political space खाऊन भाजपशी खरी टक्कर घेण्याची ताकद कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. तृणमूळ काँग्रेसच्या संघटनेला पश्चिम बंगालच्या पलिकडे नेऊन दुसऱ्या राज्यांमध्ये पसरविण्याचा त्या गंभीर प्रयत्न करताना दिसत आहेत. ममतांच्या नेतृत्वाचे हे वेगळेपण आहे.

दोन डगरींवर हात ठेऊन महाराष्ट्रात काँग्रेसची political space खाणाऱ्या परंतु आपला पक्ष पुरेसा वाढवू न शकलेल्या, “राष्ट्रीय नेतृत्वाची” नुसती हाकाटी पिटत राहणाऱ्या “महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यां”पेक्षा हे नक्की वेगळे आहे…!!

Mamata Banerjee trying to expand her TMC beyond West Bengal in Assam and Tripura

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात