धक्कादायक, एकट्या महिलेला पोलंडला कसे पाठवायचे म्हणून कर्णबधिर धावपटूची उत्तुंग कामगिरी असूनही स्पर्धेसाठी पाठविले नाही, सोबत कोणाला पाठविण्यासाठी निधी नसल्याचे कारण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण देश ऑलिम्पिकमधील विजयाचा आनंद साजरा करत आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. मात्र, एका महिला ऑलिम्पिकपटूची उत्तुंग कामगिरी असूनही केवळ तिच्यासोबत कोणाला सोबत पाठविण्यासाठी पैसे नाहीत म्हणून जागतिक स्पर्धेत पाठविण्यात आलेले नाही.Shocking, how to send a lone woman to Poland, despite the deaf Aathlets outstanding performance was not sent to the competition

पोलंड येथे २३ ते २८ ऑगस्टदरम्यान कर्णबधिरांसाठी जागतिक पातळीवरील स्पर्धा होणार आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील श्रवणदोष असलेल्या समीहा हिने उत्तुंग कामगिरी केलेली आहे. १८ वर्षीय समीहा हिच्यात श्रवणदोष आहे.मात्र, तिने लांब उडी आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलेली आहे. वयाच्या बाराव्या वषार्पासून स्पर्धा गाजवित असलेल्या समीहाने अनेक सुवर्णपदकांची कामगिरी केली आहे. मात्र, समीहासोबत जाणाऱ्यांचा खर्च करण्यासाठी निधी नाही म्हणून तिला स्पर्धेसाठी न पाठविण्याचा निर्णय भारतीय खेल प्राधीकरणाने (साई) घेतला आहे.

समीहाची आई सलामह म्हणाल्या समीहाने १०० मीटर ट्रॅकमध्ये १९८६ चा विक्रम मोडला आहे. एक उत्कृष्ट धावपटू आहे. तरीही तिला वगळून फेडरेशनने अन्याय केला आहे. तिच्यासाठी आता मी लढणार आहे.

जुलै २०१९मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीत समीहाने पाच मीटरची लांब उडी मारली होती. पात्रतेसाठीचे अंतर ४.२५ मीटर आहे. त्यानंतर १६ जुलै २०२१ रोजी, ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल फॉर डेफने(एआयएससीडी) जागतिक कर्णबधिर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी राष्ट्रीय निवड चाचणी जाहीर केली.

यासाठी 12 क्रीडापटूंची निवड करण्यात आली. त्यापैकी दोन महिला खेळाडूत समीहाचाही समावेश होता. २२ जुलै रोजी चाचणी दरम्यान दुसºया महिला खेळाडूची निवड रद्द झाली. त्यामुळे समीहा एकमेव महिला खेळाडू राहिली. समीहासोबत कोणाला पाठवायचे असल्यास निधीचा प्रश्न आहे.

त्यामुळे आता एकट्या महिला खेळाडूला परदेशात कसे पाठवायचे म्हणून साईने तिला स्पर्धेसाठी पाठवायचे नाही असा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) महिला खेळाडूला पाच पुरुष खेळाडूंसोबत पोलंडला पाठविण्यास तयार नाही.

Shocking, how to send a lone woman to Poland, despite the deaf Aathlets outstanding performance was not sent to the competition

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण