योगी आदित्यनाथांना मथुरेतून निवडणुकीसाठी उभे करण्याची जे. पी. नड्डांकडे मागणी, खासदाराने सांगितले भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने लिहिले पत्र


विशेष प्रतिनिधी

मथुरा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना मथुरा विधानसभा मतदारसंघातून उभे करा अशी विनंती भाजपाच्या खासदाराने राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने आपण हे पत्र लिहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.Field Yogi Adityanath for election from Mathura. Demand to Nadda, the MP said, a letter written on the inspiration of Lord Krishna

उत्तर प्रदेशचे राज्यसभेचे सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी ३ जानेवारीला नड्डा यांना यासंदर्भात पत्र लिहीले आहे. जर पक्षाने योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून उमेदवारी दिली तर संपूर्ण राज्य आणि देशातील जनतेला आनंद होईल. हे पत्र लिहिण्यासाठी भगवान कृष्णाने प्रेरित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



 

यादव यांनी म्हटले आहे की, पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल, पण मी तुम्हाला अत्यंत नम्र शब्दांत विनंती करतो की, त्यांना मथुरा या शहरातून निवडून देण्याची विशेष इच्छा आहे.

हे पत्र लिहिण्यासाठी मला स्वत: भगवान श्रीकृष्णाने प्रेरित केले आहे. आपणास नम्र विनंती आहे की, ब्रज भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समस्त कलाधारी भगवान श्री कृष्णाच्या नगरीतून उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार करा.

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सांगितले होते की ते आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत आणि ते कोठून लढायचे हे भाजपचे सर्वोच्च नेतृत्व ठरवेल. सध्या योगी उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य आहेत.उत्तर प्रदेश सरकारमधील ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा हे सध्या मथुराचे आमदार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी वादाचा मुद्दा भाजपा नेते सातत्याने उपस्थित करत आहेत. हरनाथ सिंह यादव यांनी स्वत: हे प्रकरण संसदेच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात उचलून धरले होते आणि केंद्र सरकारचा प्रार्थनास्थळ कायदा, १९९१ रद्द करण्याची मागणी केली होती.

या कायद्याला त्यांनी अतार्किक आणि घटनाबाह्य ठरवले होते. झिरो अवर दरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना भाजपाचे यादव म्हणाले होते की, हा कायदा भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्यात भेदभाव निर्माण करतो. यापूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिरांचे बांधकाम सुरू असून मथुरेत मंदिरे उभारण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते.

Field Yogi Adityanath for election from Mathura. Demand to Nadda, the MP said, a letter written on the inspiration of Lord Krishna

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात