बनावट ई-पासचे रॅकेट, डोनाल्ड ट्रंप आणि अमिताभ बच्चन यांनाही यायचेय सिमल्याला!


देशातील विविध राज्यांत आणि शहरांत लॉकडाऊन लागल्यावर अनेक जण सिमल्यासारख्या पर्यटनस्थळी येत आहे. त्यासाठी बनावट ई-पासचे रॅकेटच चालविले जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रप आणि प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावावरही सिमल्याला ई-पास बनविण्यात आला. विशेष म्हणजे पोलीसांनीच हा ई-पास जारी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे.Fake e-pass racket, Donald Trump and Amitabh Bachchan also want to come to Simla!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांत आणि शहरांत लॉकडाऊन लागल्यावर अनेक जण सिमल्यासारख्या पर्यटनस्थळी येत आहे. त्यासाठी बनावट ई-पासचे रॅकेटच चालविले जात आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रप आणि प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावावरही सिमल्याला ई-पास बनविण्यात आला. विशेष म्हणजे पोलीसांनीच हा ई-पास जारी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे.



हिमाचल प्रदेशात लॉकडाऊन लावल्यावर २७ एप्रिलपासून राज्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला. सिमल्यामध्ये येण्यासाठी नागरिकांची सर्वात गर्दी होती.

त्यामुळेच एकाने थेट डोनाल्ड ट्रंप आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाने बनावट ई-पास बनविला. धक्कादायक म्हणजे हिमाचल प्रदेश पोलीसांनी हा ई-पास जारीही केला.

एकाच मोबाईल क्रमांकावरून आणि आधार कार्डच्या सहाय्याने हे दोन ई-पास बनविण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यावर सिमल्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमल्यामध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणी करणे अनिवार्य असून कोरोना निगेटिव्ह असल्यासच प्रवेश मिळत आहे. मात्र, अमिताभ आणि ट्रंप यांच्यासारख्या प्रसिध्द व्यक्तींच्या नावावर ई-पास बनविले जातात आणि पोलीसांना समजतही नाही हे धक्कादायक आहे.

Fake e-pass racket, Donald Trump and Amitabh Bachchan also want to come to Simla!

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात