उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यात नियोजित वेळीच होणार निवडणुका, मुख्य निवडणूक आयुक्तांचा विश्वास


पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका नियोजित वेळीच होणार असल्याचा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी व्यक्त केला आहे.Elections will be held on time in five states, including Uttar Pradesh and Punjab, the Chief Election Commissioner said


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका नियोजित वेळीच होणार असल्याचा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी व्यक्त केला आहे.

गोवा, मणिपुर, पंजाब और उत्तराखंड विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये समाप्त होणार आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेची मुदत मे २०२२ पर्यंत आहे. चंद्रा पत्रकारांशी बोलताना म्हणाले,



निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की कोणत्याही विधानसभेती मुदत संपण्याअगोदर त्याठिकाणी निवडणुका पूर्ण करून निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सुपूर्द करायची.

या पाचही राज्यांत वेळेत निवडणुका होऊ शकतील का? कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका टाळल्या आहेत. त्यावर चंद्रा म्हणाले सगळ्यांनाच माहित आहे की कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी होत आहे. आम्ही महामारीच्या काळात बिहारमध्ये निवडणुका घेतल्या होत्या. त्याचबरोबर चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पूर्ण केल्या. त्यामुळे महामारीतही निवडणुका घेण्याचा अनुभव आम्हाला आला आहे.

चंद्रा म्हणाले, मला पूर्ण खात्री आहे की महामारी कमी होत आहे. लवकरच कोरोनाची साथ समाप्त होईल आणि पुढील वर्षी पाच राज्यांतील निवडणुका नियोजित वेळेतच पूर्ण करणे शक्य होईल. या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांत भाजपाची सरकारे आहेत. पंजाबमध्ये कॉँग्रेसचे सरकार आहे.

Elections will be held on time in five states, including Uttar Pradesh and Punjab, the Chief Election Commissioner said

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात