महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालण्याचा नबाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

मुंबई – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी आज सायंकाळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने नबाब मलिकांनी सरकार टिकण्याचा दावा केला. Govt will complete 5 yrs, we’re together as MVA & ‘Operation Lotus’ can’t succeed: Maharashtra Min Nawab Malik on Devendra Fadnavis’statement that BJP will form govt later,if not during COVID

महाराष्ट्रात सरकार बदलाचा विषय कोरोना गेल्यानंतर हातात घेऊ, असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते विधान मलिक यांनी फेटाळून लावले. महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ यशस्वी होणार नसल्याचा दावा मलिक यांनी केला.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदार फुटणार नाहीत. उलट भाजपचेच आमदार फुटू नयेत यासाठी फडणवीस तशी विधाने करीत असल्याचा दावा मलिकांनी केला.

आज बऱ्याच दिवसांनंतर शरद पवार राष्ट्रवादीत ऍक्टीव झालेले दिसले. कालच देवेंद्र फडणवीसांनी त्यांची सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेच पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि अन्य नेत्यांची बैठक घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण ही बैठक फक्त मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी झाल्याचा दावा मलिक यांनी केला.

सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्या वडिलांशी शरद पवार थेट बोलणार आहेत. तसेच सिरमकडून राज्याला थेट कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, यासाठी केंद्राची परवानगी मागणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

Govt will complete 5 yrs, we’re together as MVA & ‘Operation Lotus’ can’t succeed: Maharashtra Min Nawab Malik on Devendra Fadnavis’statement that BJP will form govt later,if not during COVID

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात