पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, मायावतींची बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती या सगळ्या राजकीय पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला. याचे बाकीचे काय राजकीय परिणाम त्या पक्षांवर व्हायचे ते होवोत, पण विशेषतः पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि ममतांच्या तृणमूळ काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेला, यामुळे काँग्रेसला मात्र राजकीय आनंदाचे भरते आले आहे!! Election commission verdict on national status withdrawn of NCP and TMC, political morale boosting for Congress highcommand

शरद पवार काय किंवा ममता बॅनर्जी काय, हे काँग्रेस हायकमांडला नेहमीच टोचणारे नेते आहेत. जिथे – जिथे संधी मिळेल तिथे – तिथे पवार आणि ममता काँग्रेस हायकमांडला राजकीय दृष्ट्या कॉर्नर करून ठोकत असतात. तो त्यांच्या राजकीय डावपेचाचा भाग आहे. पण आपापल्या राज्यांमध्ये त्यांनी आपापले दोन्ही पक्ष मूळ काँग्रेसचीच संघटना पोखरून मजबूत केले आहेत, हे काँग्रेस हायकमांड कधीच विसरत नाही.

चंद्रशेखर राव यांनीही तेलंगणात तसेच केले आहे. पण पवार आणि ममता यांच्यावर काँग्रेसच्या हायकमांडचा जेवढा राग आहे, तेवढा राग चंद्रशेखर राव यांच्यावर नाही. कारण चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतलेला नाही, तर त्यांच्या पक्षाचा प्रादेशिक दर्जाच काढून घेतला आहे. त्यामुळे या घटनेचा काँग्रेस हायकमांडला आनंद झाला असेल, तर तो छोटा आहे. पण पवार आणि ममतांच्या अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेणे हे काँग्रेस हायकमांडसाठी राजकीय आनंदाबरोबरच राजकीय परिणामाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे!!



सावरकर, अदानी मुद्द्यापासून ते ईव्हीएम पर्यंत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने काँग्रेस हायकमांड दुखावेल, एवढे टोचले होते. हा फार जुना इतिहास नाही. काल – परवाचाच आहे. सावरकर – अदानी हे विषय तर आजही सुरू आहेत. याचा राग निश्चित काँग्रेस हायकमांडच्या माझ्या मनात आहे.

ममता बॅनर्जी यांनी देखील पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर सुरुवातीला सोनिया आणि राहुल यांची भेट घेतली हे खरे, पण नंतरच्या काळात मात्र त्यांचेही राजकीय प्रयत्न काँग्रेस हायकमांडला टोचण्याचे आणि काँग्रेसला विरोधी आघाडीतून वगळण्याचेच राहिले आहेत. काँग्रेस सोडून बाकीच्या विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केले आहेत. पवारांनी तसे प्रयत्न उघडपणे केलेले नाहीत, पण काँग्रेसला “गरजेपेक्षा जास्त” महत्त्व देऊ नये, या मताचे तेही आहेत, हे त्यांनी न बोलता स्पष्ट केले आहे आणि इथेच काँग्रेसला पवार आणि ममता यांच्या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा जाणे याचा राजकीय परिणाम आनंददायी ठरला आहे.

पवार आणि ममता या दोन्ही प्रादेशिक नेत्यांची काँग्रेसशी बार्गेनिंग करण्याची कपॅसिटी या निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे कमी होण्याची शक्यता आहे. भले पवार आणि ममता बॅनर्जी ते मान्य करणार नाहीत किंवा वेगळ्या मार्गाने ते काँग्रेस वर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील, पण म्हणून त्यांचे राष्ट्रीय पातळीवरून घसरलेले नेतृत्व त्यामुळे एस्टॅब्लिश होणार नाही आणि काँग्रेसचे हायकमांड देखील ते स्वीकारणार नाही, हा मुद्दा इथे फार महत्त्वाचा आहे.

पवारांनी सावरकर – अदानी मुद्द्यांवर काँग्रेसला जे बॅकफूटवर ढकलले होते. त्याविषयी तर हायकमांड मध्ये प्रचंड रोष आहे. आता ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदींच्या आधारे काढून घेतला आहे, तो काँग्रेससाठी राजकीय “मोराल बुस्टिंग” ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने राजकीय चिमटे काढण्याची यातून संधी मिळाली आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या टेबलवर काँग्रेस आता राष्ट्रवादी समोर “रिसीव्हिंग एंडला” बसणार नाही, तर ती “ड्रायव्हर सीटवर” बसण्याची शक्यता आहे. किंबहुना काँग्रेस नेते पवारांच्या नेत्यांपेक्षा याबाबतीत जास्त “तयार” आहेत.

शरद पवार हे “राष्ट्रीय” नेते आहेत, हा मराठी माध्यमांचा लाडका सिद्धांत आहे. पण तो सिद्धांत निवडणूक आयोगाने कायदेशीर कसोटीवर रद्द ठरवला आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते पवारांचा उल्लेख राष्ट्रीय नेते म्हणून जरूर करतील. पक्षीय पातळीवर काँग्रेसचे नेते त्या संबोधनाला बाधाही आणणार नाहीत. पण ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खरी स्पर्धा निर्माण होईल, त्यावेळी काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांचा “राष्ट्रीय दर्जा” गेला आहे आणि त्यांचा पक्ष “प्रादेशिक दर्जाचा” उरला आहे, याची जाणीव निश्चित करून देतील. हा निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम ठरणार आहे!!

Election commission verdict on national status withdrawn of NCP and TMC, political morale boosting for Congress highcommand

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात