West Bengal assembly elections, प्रचाराच्या वेळेला कात्री; ४८ तास नव्हे, ७२ तास आधी प्रचार संपविणार; निवडणूक आयोगाचे नवे कठोर निर्बंध


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये उरलेल्या ३ टप्प्यातील मतदान जरी एका टप्प्यात आणले नाही, तरी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर, नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कठोर निर्बंध आणले आहेत. प्रचाराच्या वेळांवर निवडणूक आयोगाने मोठी कात्री चालवली आहे.Election Commission (EC) curtails the timing of the campaign up to 7 PM. There shall not be any campaign between 7 PM and 10 AM on campaign day.

प्रचार नेहमी मतदानाच्या आधी ४८ तास संपविला जातो. पण पुढच्या तीन टप्प्यांमधील प्रचार ७२ तास आधी संपविण्याचे बंधन निवडणूक आयोगाने जारी केले आहे.



प्रचाराच्या वेळेतही बदल करून रॅली, रोड शो, जाहीर सभा, छोट्या – मोठ्या सभांच्या वेळा सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंतच ठेवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ सायंकाळी ७.०० नंतर ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही.

निवडणूक आचारसंहितेत कोविड प्रोटोकॉलचा समावेश करून रॅली, रोड शो, जाहीर सभा, प्रचारफेऱ्या आयोजित करणाऱ्यांवर निर्बंधांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मास्क, सॅनिटायझर वगैरे सुविधा रॅली, सभांच्या आयोजकांनी सर्वांना पुरविले पाहिजे. त्याची व्यवस्था आणि अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे.

या सगळ्या व्यवस्थांचा खर्च निवडणूक आयोगाने आधीच नियमावलीत दिलेल्या खर्चाच्या मर्यादेतच केला पाहिजे.अन्यथा राजकीय पक्षांवर, नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर, आयोजकांवर फौजदारी कलमांपर्यंतचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

रॅली, रोड शो, जाहीर सभा, प्रचारफेऱ्या यांच्यात सहभागी होणाऱ्या स्टार कँम्पेनर्स, राजकीय नेते, उमेदवार, धोरणकर्ते या सर्वांनी आपल्या वैयक्तिक वर्तणुकीतून मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटाजर वापर यांच्यासंदर्भात उदाहरण घालून दिले पाहिजे. यातून गर्दीचे नियमन करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.

या नवीन निर्बंधांसह निवडणूकीचे उर्वरित ३ टप्पे पार पडतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Election Commission (EC) curtails the timing of the campaign up to 7 PM. There shall not be any campaign between 7 PM and 10 AM on campaign day.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात