प्राण्यांनाही कोरोना, हैैद्राबादमधील आठ सिंह कोरोनाबाधित


प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.Eight lions corona contaminated in Hyderabad


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यानी ही माहिती दिली आहे.

चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिलेली नाही.रिपोर्टनुसार, या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील.त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्राणीसंग्रहलयातील अधिकाºयांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का याची माहिती मिळणार आहे.

नेहरू जूलॉजिकल पार्कच्या प्रवकत्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर सिंहांची चाचणी करण्यात आली. आम्ही अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. डॉक्टर सिंहांच्या प्रकृतीचं परिक्षण करत आहेत.

यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र आता भारतात पहिल्यांदाच प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

24 एप्रिलला प्राणीसंग्रहालयातील केअरटेकर्सना सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं आणि खाणं जात नसल्याची लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने पशुपालन अधिकाºयांना त्याबाबत माहिती देण्यात आली.

त्यानंतर सिंहांचा स्वॅब घेण्यात आला आणि ते सीसीएमबीला पाठवण्यात आले. कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय असलेले नेहरू जूलॉजिकल पार्क पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. प्राणी संग्रहालयातील 12 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Eight lions corona contaminated in Hyderabad

महत्त्वाची बातमी

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण