दिलासादायक, देशात रेमडेसिवीरचे उत्पादन झाले तिप्पट

कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन तिपटीने वाढून दरमहा १.०५ कोटी झाले आहे.Reassuringly, the country tripled the production of remedesivir


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन तिपटीने वाढून दरमहा १.०५ कोटी झाले आहे.

केंद्रीय रसायन व खते, राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी सांगितले की, देशात रेमडेसिविरचे उत्पादन दरमहा तिप्पट वाढल्यानं १.०५ कोटी झाले आहे . अँटीव्हायरल असलेल्या औषधाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.मांडवीया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, औषध निर्मितीची क्षमता ४ मे रोजी दरमहा १.०५ कोटी डोस पर्यंत ओलांडली आहे. या वर्षी १२ एप्रिलपर्यंत ३७ लाख डोस होती. अशा प्रकारे उत्पादन क्षमता जवळपास तीन पट वाढली आहे. या अँटीवायरल औषधाची निर्मिती सध्या देशातील ५७ मशिनरीद्वारे केली जात आहे. लवकरच आम्ही वाढत्या मागण्या पूर्ण करू.

मंडाविया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.देशातील कोविड संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याआधी रेमेडीसवीरची मागणीही अनेक पटींनी वाढली आहे.

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांनाच गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागता आहे. ऑक्सिनजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांचा तुटवडा यांमुळे जास्तीत जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे.

गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रेमडेसिविर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी खूप वणवण करावा लागत आहे. मात्र, उत्पादनात वाढ झाल्याने आता सर्वसामान्यांना हे इंजेक्शन मिळणे सोपे होणार आहे.

Reassuringly, the country tripled the production of remedesivir