लक्षणीय क्षमतावाढ : रेमडेसिवीरचे उत्पादन महिन्याला ४० लाखांवरून थेट ९० लाखांवर!


कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संपूर्ण देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच वेळी एक दिलासादायक बातमी आली आहे. लवकरच देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन महिन्याला ९० लाख इंजेक्शन होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.According to Union Minister of State Mansukh Mandvi, 90 lakh Remedesivir injections will be produced per month


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संपूर्ण देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच वेळी एक दिलासादायक बातमी आली आहे.

लवकरच देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन महिन्याला ९० लाख इंजेक्शन होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.संपूर्ण देशात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत आहे.



मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने तुटवडा भासू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन करणºया कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. सध्या देशात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याने उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले.

त्याला कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वतीने कोरोनाग्रस्त राज्यांना रेमडेसिवीर इंजेकन पुरविण्याचा निर्णयही घेतला आहे. संपूर्ण देशात एक कोटी इंजेक्शन येत्या काही दिवसांत पुरविले जाणार आहेत.

त्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे केंद्राच्या वतीने पुरविण्यात येणाºया रेमडेसिवीरचा मोठा वाटा महाराष्ट्राला मिळणार आहे.मांडविय यांनी सांगितले की देशात यापूर्वी दर महिन्याला ४० लाख रेमडेसिवीरचे उत्पादन होत आहे.

त्यामध्ये वाढ करून ९० लाखांपर्यंत उत्पादन जाणार आहे. दररोज तीन लाख रेमडेसिवीर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशातील तुटवडा लवकरच कमी होणार आहे.

According to Union Minister of State Mansukh Mandvi, 90 lakh Remedesivir injections will be produced per month

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात