दक्षिणेतील लेडी अमिताभ विजयशांतिचा भाजपामध्ये प्रवेश, हैैद्राबादमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचा त्याग


दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत केसीआरवर नाराज असलेले अनेक नेतेही भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. vijayashanti join bjp


वृत्तसंस्था

हैैद्राबाद : दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत केसीआरवर नाराज असलेले अनेक नेतेही भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. vijayashanti join bjp

विजयशांति यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह किशन रेड्डी आणि इतर अनेक नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर विजयशांतिने कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घषतला. २०१४ मध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सोडून विजयशांति यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. vijayashanti join bjp

हैैद्राबाद महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. याउलट भाजपाने मात्र शानदार विजय मिळवित ४८ जागा घेतल्या.

हैद्राबादनंतर आता भाजपाचे मिशन मुंबई, नेत्यांनी केला विश्वास व्यक्त

विजयशांति यांनी 1997 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यांना तेलगू चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन म्हटले जाते. विशेष म्हणजे त्यांनी भाजपामधूनच आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. तेलंगणासाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी केसीआर यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर त्यांंनी टीआरएसमध्ये प्रवेश केला.

vijayashanti join bjp

२००९ आणि २०१४ मध्ये मेडक या मतदारसंघाचून त्यांनी टीआरएसतर्फे निवडणूक लढवून जिंकलीही होती. विजयशांति तब्बल ४० वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी १८० चित्रपटांत काम केले आहे. त्यामध्ये तेलगू, तामिल, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. १९९० मध्ये कर्तव्य या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी अनेक चित्रपटांत सुपर कॉपची भूमिका केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात