Bajaj Chetak : अरारारा खतरनाक! बुलेटपेक्षा महाग झाली बजाजची चेतक स्कूटर, असे आहेत भन्नाट फीचर्स

Bajaj Chetak scooter price hiked second time since launch last year

Bajaj Chetak : बजाजच्या चेतक स्कूटरचा एकेकाळी स्वॅग होता. भारतात जेव्हा वाहनांचे मोजकेच पर्याय होते, तेव्हा चेतकची तरुणाईला क्रेझ होती. कंपनी आता याच चेतकला अत्याधुनिक रूपात लाँच करत आहे. तुम्हाला जर बजाजची ही नवी चेतक खरेदी करायची असेल तर पैसेही जास्त मोजावे लागतील. लाँचिंगपासून कंपनीने चेतकच्या किमतीत दोन वेळा वाढ केली आहे. मागच्या आठवड्यातच कंपनीने बजाज चेतकची बुकिंग सुरू केली होती, परंतु 48 तासांतच त्यांना ती बंद करावी लागली. Bajaj Chetak scooter price hiked second time since launch last year


 

मुंबई : बजाजच्या चेतक स्कूटरचा एकेकाळी स्वॅग होता. भारतात जेव्हा वाहनांचे मोजकेच पर्याय होते, तेव्हा चेतकची तरुणाईला क्रेझ होती. कंपनी आता याच चेतकला अत्याधुनिक रूपात लाँच करत आहे. तुम्हाला जर बजाजची ही नवी चेतक खरेदी करायची असेल तर पैसेही जास्त मोजावे लागतील. लाँचिंगपासून कंपनीने चेतकच्या किमतीत दोन वेळा वाढ केली आहे. मागच्या आठवड्यातच कंपनीने बजाज चेतकची बुकिंग सुरू केली होती, परंतु 48 तासांतच त्यांना ती बंद करावी लागली.

गतवर्षी 14 जानेवारी 2020 रोजी लाँच झालेल्या बजाज चेतकच्या किमतीत तब्बल 42,620 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. लॉन्च प्राइसच्या तुलनेत या वाहनाच्या किमतीत 42% टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या अर्बन आवृत्तीची 1 लाख रुपये आणि प्रीमियम आवृत्तीची 1.15 लाख रुपये किंमत होती.

लाँच झाल्यापासून दोन वेळा दरवाढ

अर्बन व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपयांवरून वाढून 1.15 लाख रुपये झाली होती. तर याच्या प्रीमियम व्हेरिएंटसाठी तुम्हाला आता 1.20 लाख रुपये मोजावे लागणार होते. परंतु कंपनीने पुन्हा एकदा किमतींमध्ये वाढ केली आहे. लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 29620 रुपये आणि अर्बन व्हेरिएंटची किंमत 42,620 रुपयांनी वाढली आहे.

आता या दरवाढीनंतर तुम्हाला चेतक अर्बनसाठी 1,42,620 रुपये, तर चेतक प्रीमियमसाठी 1,44,620 रुपये मोजावे लागतील. या तुलनेत बुलेट स्वस्त आहे. कारण बुलेट 350ची सुरुवातीची किंमत 1,30,593 रुपये आहे.

बजाजची चेतकमध्ये तुम्हाला 6 रंगांचे पर्याय मिळतात. माइलेजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फुल चार्ज झाल्यावर इलेक्ट्रिक इको मोडमध्ये 95 किलोमीटरहून जास्त आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 85 किलोमीटरपर्यंत ही चालते असा कंपनीचा दावा आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिकच्या बॅटरीवर कंपनी 3 वर्षे किंवा 50,000 किमी वॉरंटी देत आहे. दुसरीकडे, चेतकची बॅटरी लाइफ 70,000 किमीपर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

नव्या बजाज चेतक इलेक्ट्रिकची वैशिष्ट्ये

नव्या बजाज चेतकमध्ये फिक्स्ड टाइप Li-Ion बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी स्टँडर्ड 5-15 amp आउटलेटने चार्ज करता येईल. यात ग्राहकांना होम चार्जिंग स्टेशनचाही पर्याय देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिव्हर्स गिअरचाही पर्याय आहे. यातील बॅटरी कएा तासात 25 टक्के आणि पाच तासांत फुल्ल चार्ज होते. याशिवाय तुम्हाला यात सीटवर काँट्रास्ट स्टिचिंग, प्रीमियम लूक, LED हेडलॅम्प आणि टेल लाइट, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स और मोनोशॉक, स्टेप्ड सीट्स असे फीचर्स मिळतात.

Bajaj Chetak scooter price hiked second time since launch last year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण