पंतप्रधान मोदींच्या धोरणांना आणि प्रकल्पांना जनतेचीही साथ, अमित शहा यांनी केले कौतुक


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सुरक्षित, समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्यासाठी हाती घेतलेल्या धोरणांना आणि प्रकल्पांना जनतेचीही साथ लाभली आहे. त्यामुळे भाजपचा चार राज्यांमध्ये दणदणीत विजय झाला. पंतप्रधान मोदींवरील जनतेचा विश्वास आणखी वाढल्याचेच या विजयातून दिसले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.The people also supported Prime Minister Modi’s policies and projects, Amit Shah said

अमित शहा यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात ३४ गावांमध्ये २२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते भोयान मोटी या गावात शनिवारी झाला. त्यावेळी अमित शहा बोलत होते. भाषणात बोलताना शहा म्हणाले, उत्तर प्रदेश , गोवा , मणिपूर, उत्तराखंड येथील विजयामुळे या राज्यांत विकासाचे एक नवे पर्व सुरू होणार आहे.



पंतप्रधानांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास कायम असल्याचेच या निवडणुकीत दिसले. पाच राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमात व्यग्र असल्यामुळे माज्या मतदारसंघात मला येता आले नाही. निवडणूक संपल्यानंतर लगेचच विकास प्रकल्पांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्या नागरिकांच्या पसंतीस उतरल्या;

तसेच या योजनांचा अनेकांना फायदा झाला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना मोदींनी अहोरात्र काम केले. सर्वसमावेशक विकासासाठी ते आग्रही होते. गरीब नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय, मजूर अशा सर्व घटकांच्या विकासाला मोदींचे प्राधान्य राहिले आहे. या चारही राज्यात भाजप सरकारने हेच केले. त्यामुळे नागरिकांनी भाजपला सत्ता दिली.

आयुषमान भारत योजनेचा फायदाही अनेकांना झाला असे सांगून शहा म्हणाले, ह्यमुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. जन औषधी केंद्रात स्वस्तात औषधे उपलब्ध झाली. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये १० वैद्यकीय विद्यालये होती. २०२२मध्ये ही संख्या ४०वर पोहोचली असून,

२०२४पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये होतील. मोदी सरकाने वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, गॅस सिलिंडर, आरोग्यसेवा अशा मूलभूत गोष्टी नागरिकांना देण्यावर भर दिला. कोविड काळात करोना प्रतिबंधक लशीही मोफत देण्यात आल्या. त्यामुळेच नागरिकांनी भाजपला मतदान केले.

The people also supported Prime Minister Modi’s policies and projects, Amit Shah said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात