शाहीनबागेतून 400 कोटींच्या ड्रग्स पाठोपाठ दिल्लीत 434 कोटींचा हेरॉईनचा साठा जप्त!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शाहीन बाग 28 एप्रिल रोजी तब्बल 400 कोटींची ड्रग्स पकडल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीत तब्बल 434 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. केंद्रीय महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई केली असून परदेशातून कार्गो विमानाने हा साठा दिल्लीत पोहोचला होता. एकूण 54 किलो एवढा हिरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 434 कोटी रुपयांची आहे. Drugs worth Rs 400 crore seized from Shaheen Bagh, heroin worth Rs 434 crore seized in Delhi

कार्गो एअर मधून कुरियरने हे हेरॉईन पोचणार असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीवर आधारित गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट राहून कारवाई केली. यात 54 किलो हेरॉईनचा साठा सापडला.

28 एप्रिल नंतरची दिल्लीतली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 28 एप्रिलला शाहीन बागेतून तब्बल 400 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त केली होती. त्यानंतर आता 434 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

– शाहीन बाग ड्रग्सचा अड्डा

सीएए विरोधातील आंदोलनात चर्चेत आलेली शाहीनबाग आता ड्रग्स माफियांचा अड्डा असल्याचे स्पष्ट झाले. ११ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० या कालावधीत दिल्लीतील मुस्लिम समाजातील शेकडो कुटुंबांनी शाहीन बाग रस्त्यावर बेमुदत ठिय्या मांडला होता. सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिमांनी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी या भागाचा राजकीय वापर केला, आज तोच भाग पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी 50 किलो ड्रग्ज आणि 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

या भागातून नोटा मोजण्याची मशीनदेखील हस्तगत करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे 400 कोटी रुपये होती. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते. इंडो-अफगाण सिंडिकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानातून आणण्यात आलेले हेरॉईन फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद होते.

अफगाणिस्तान पाकिस्तानात धागेदोरे

या सिंडिकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत जात असल्याचे समजते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात छापे टाकण्यात आले. ड्रग्ज तस्करीच्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश आले. या सिंडिकेटमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.

Drugs worth Rs 400 crore seized from Shaheen Bagh, heroin worth Rs 434 crore seized in Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात