NIA Court : काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, सय्यद सलाउद्दीनवर युएपीए आरोपपत्र दाखल!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये 1990 च्या दशकापासून दहशतवादाचा धुमाकूळ घालणारे आणि काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणारे फारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, मोहम्मद सलाहुद्दिन यांच्यावर अखेर कायद्याचा पंजा कसला असून त्यांच्याविरोधात 124 देशद्रोह आणि युएपीए कायद्याअंतर्गत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. UAPA chargesheet against Kashmiri terrorists Bitta Karate, Shabbir Shah, Hafiz Saeed, Syed Salahuddin

19 मे रोजी विशेष न्यायाधीश प्रवीणसिंह मालिक या सर्व आरोपींवरील खटल्याची सुनावणी घेणार असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. लष्कर – ए – तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्या मोहम्मद सलाहउद्दीन हे दोघेही सध्या पाकिस्तानात आहेत. त्यांना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करून फरार जाहीर केले आहे. परंतु त्यांच्याविरुद्ध नुसार खटला चालणार आहे. युएपीए कलम 16 ते कलम 20 प्रत्यक्ष दहशतवादी कृत्ये करणे, दहशतवाद्यांसाठी फंडिंग करणे, देशाविरुद्ध कटकारस्थाने रचणे आदी कलमांअंतर्गत या सर्वांविरुद्ध खटला चालवण्यात येणार आहे.

– या दहशतवाद्यांविरुद्ध आरोपपत्र

फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद यूसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वटाली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल राशिद शेख, और नवल किशोर कपूर सहित अन्य कश्मिरी कुठे रतावा दि नेत्यांविरुद्ध आरोपपत्र निश्चित करण्यात आले आहे यामध्ये लश्कर-ए-तैयबा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सैयद सलाहुद्दीन या दोघांचाही समावेश आहे.

हाच तो सय्यद सलाहउद्दीन आहे, ज्याला कंदाहार विमान अपहरण प्रकरणात ओलीस धरलेल्या निष्पाप प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारला सोडून द्यावे लागले होते. त्यानंतर हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पळून गेला आहे.

UAPA chargesheet against Kashmiri terrorists Bitta Karate, Shabbir Shah, Hafiz Saeed, Syed Salahuddin

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात