ASI Survey : ज्ञानवापी मशिदीसह देशभरातील 10 प्रमुख मशिदींच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाची गरज!!


वाराणसी मधील काशिनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदच नव्हे, देशभरातील मोठ्या शहरांमधील 10 मशिदी या मंदिरे पाडून अथवा मंदिरांच्या ढाच्यावर बनविल्याचा वाद आहे. Need for archeological survey of 10 major mosques across the country including Jnanvapi Mosque

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वाशिम रिजवी यांनी या 10 मशिदी हिंदू समुदायाला सोपवण्याची आधीच सूचना केली आहे. या दहा मशिदींमध्ये मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या समोरील मशिदीचा समावेश आहेच, पण त्याचबरोबर दिल्ली, आग्रा मध्यप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल इथल्या देखील मशिदींचा समावेश आहे.

या सर्व मशिदींचे भारतीय पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करून घेऊ ऐतिहासिक सत्य बाहेर आणावे अशी मागणी आता जोर धरत आहे. कारण या सर्व मशीद परिसरात मध्ये आणि प्रत्यक्ष मशिदीमध्ये हिंदू मंदिरांच्या ठळक खुणा आढळतात.

अयोध्येतील बाबरी मशीद राम जन्मभूमी चा वाद संपला आहे. बाबरी मशिदीचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. तेथे आता भव्य राम मंदिर उभे राहत आहे.– अयोध्येतील आधीच्या बाबरी मशिदीखेरीज

मथुरेतील ईदगाह मशिद, वाराणसीतील ज्ञानवापी मशिद, जौनपुर मधील अटाला मशिद, गुजरातच्या पाटन मधील जामी मशिद, अहमदाबाद मधील जामा मशिद, पश्चिम बंगालच्या पांडुआ मधील अदिना मशिद, मध्य प्रदेशतील विदिशा मधील बीजा मंडल मशिद आणि दिल्लीतील कुव्वत-उल-इस्लाम मशिद, कुतुब मिनार या 10 मशिदींचा समावेश आहे.

– ज्ञानवापी मशिद, वाराणसी, उत्तर प्रदेश

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरा जवळ असलेली ज्ञानवापी मशिदीचा शेकडो वर्षांचा वाद आहे. 1699 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मूळ मंदिर उद्ध्वस्त करून ज्ञानवापी मशिद बांधली.

सध्याचे काशी विश्वनाथ मंदिर सतराशे 80 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे त्यावर पंजाबचे महाराजा रणजीत सिंह यांनी सोन्याचा कळस चढवला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर भव्य स्वरूपात तयार होत आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून सध्या कोर्टात वाद सुरू आहे. तेथील तळघर आणि ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षण करू द्यावे, अशी मागणी होत आहे. याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

– शाही ईदगाह मशिद, मथुरा, उत्तर प्रदेश

मथुरा येथील शाही ईदगाह मशिद भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी परिसराला लागून आहे. तेथे पूर्वी भव्य केशवनाथ मंदिर होते. 1669 – 70 मध्ये केशवनाथ मंदिराला औरंगजेबाने नष्ट करून तेथे ईदगाह मशिद बांधली.

1935 मध्ये आलाहाबाद हायकोर्टाने 13.37 एकर की विवादित भूमि बनारसचे महाराजा कृष्ण दास यांना अलॉट करून दिली होती. 1951 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमि ट्रस्टने ही भूमि अधिग्रहीत केली होती. हा ट्रस्ट 1958 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ और 1977 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान या नावांनी रजिस्टर्ड झाला.

1968 मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ और शाही ईदगाह कमिटीमध्ये समझोता झाला. यानुसार 13.37 एकर जमिनीची मालकी ट्रस्टला मिळाली. आणि ईदगाह मशिदीचे मॅनेजमेंट ईदगाह कमेटीला दिले गेले. आता मथुरेतील मशिदीचेही सर्वेक्षण करण्याची आणि व्हिडीओग्राफी करण्याची मागणी होत आहे.

– ताजमहल, आग्रा उत्तर प्रदेश

ताजमहाल बाबत तेजोमहालय ते जयपूर घराण्याचे महाल तिथपर्यंत दावे-प्रतिदावे आहेत. मुघल बादशाह शाहजहांने 1653 मध्ये मुमताज महाल चा मकबारा म्हणून बांधल्याचे मानण्यात येते. परंतु, यावर ऐतिहासिक वाद आहे.

ताजमहल चार मजली आहे. यातील पहिल्या दोन मजल्यांवरील 22 खोल्या उघडून तेथील चिन्हे आणि हिंदू मंदिरांच्या आणि मूर्तींच्या खुणा पहाव्यात आणि त्याचे सर्वेक्षण करावे अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल आहे. इतिहासकार पु. ना. ओक यांच्या मते ताजमहाल हे तेजोमहालय म्हणजे शिवमंदिर आहे.

– कमल मौला मशिद, धार, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातमें कमल मौला मशिदीचाही असाच वाद आहे. ही मशीद नसून हे माता सरस्वती चे प्राचीन मंदिर भोजशाला आहे परंतु मुसलमान याला आपले इबादतगाह म्हणजे मशिद मानतात.

भोजशाला मंदिराचे निर्माण हिंदू राजा भोजने 1034 मध्ये केले होते. अलाउद्दीन खिलजी ने तेराशे पाच मध्ये आक्रमण केले होते मुसलमान राजा दिलावर खान याने विजय मंदिराला नष्ट करून सरस्वती भोजशाला मंदिराचा एक भाग चे दर्ग्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मेहमूद शाह याने भोजशालेवर हल्ला करू सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या परिसरात कब्जा करून तेथे कमल मौलाना मकबरा बनवला.

1997 पूर्वी येथे हिंदूंना पूजा करण्यास मनाई होती फक्त दर्शन केले करायला परवानगी होती आता या परिसराची देखरेख आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया करत आहे. दर मंगळवारी आणि वसंत पंचमीला येथे हिंदूंना पूजा करायला परवानगी दिली आहे. मुस्लिम येथे येऊन दर शुक्रवारी नमाज पठण करतात परंतु 2006 2013 आणि 2016 मध्ये येथे सांप्रदायिक तणाव झाला होता.

– कुव्वत-उल-इस्लाम मशिद, दिल्ली

ही मशिद कुतुब मिनार परिसरात आहे. कुतुबुद्दीन ऐबकने ही मशीद बांधली होती. 27 हिंदू आणि जैन मंदिरे तोडून ही मंदिरे ही मशीद बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. मशिदीच्या पूर्व द्वारा जवळच्या एका शिलालेखात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. गेल्या 800 वर्षात या मशिदीत नमाज पठण झालेले नाही, असेही सांगण्यात येते.

कुतुब मिनार म्हणजे मुळात विष्णू स्तंभ आहे तेथे कालच काही हिंदू संघटनांनी येऊन जोरदार निदर्शने केली होती.

– बीजा मंडल मशिद, विदिशा, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात विदिशा शहरातील बीजा मंडल मशिदींवरही असाच वाद आहे. परमार राजांची पूज्य देवता चर्चिका देवी हिंदू मंदिराला नष्ट करून बीजा मंडल मशिद बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. येथील खांबांवरील शिलालेख स्पष्टपणे असे सूचित करतात की मुळात हे मंदिर देवी विजयाचे होते. याच देवीला चर्चची कादे असे नाव होते. हे मंदिर आठव्या शतकात बांधण्यात आले होते. अकराव्या शतकात परमार वंश आणि माळव्याचे राजे नरावर्मन यांनी विजया मंदिराचे पुनर्निर्माण केले होते.
औरंगजेबाच्या राजवटीत हे मंदिर नष्ट करून तिथल्या मूर्ती दफन करून या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये करण्यात आले होते.

– जामा मशिद, अहमदाबाद, गुजरात

अहमदाबाद मधील जामा मशीद भद्रकाली देवी हे मंदिर तोडून बनविण्यात आली होती हे भद्रकाली देवी मंदिर राजस्थान मधील राजा परमार राजांनी निर्माण केले होते अहमदाबादचे ऐतिहासिक नाव भद्रा होते. येथे नवव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत परमार राजांचे राज्य होते. मात्र चौदाशे 24 मध्ये अहमद शहा याने हे मंदिर तोडून तेथे जमा मशिद बांधली.

– या मशिदीचे खांब पूर्णपणे हिंदू परंपरा सांगतात. या खांबांवर कमळ, हत्ती, कुंडली नाग, नर्तकी, घंटा आणि विविध नक्षीकाम आहे. जे थेट हिंदू परंपरा सांगतात.

– अटाला मशिद, जौनपुर, उत्तर प्रदेश

जौनपूर मधील अटला मशीद देखील तिथल्या अटला देवीचे मंदिर तोडून 1408 मध्ये इब्राहिम शरीकीने बांधले होती. अटला देवीचे मंदिर गढवालचे महाराजा विजय चंद्र यांनी बांधले होते.

– अदिना मस्जिद, मालदा, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्हयातील पांडुआ मधील अदिना मशिद 1358-90 मध्ये सिकंदर शाहने बांधली. येथील प्राचीन आदिनाथ मंदिर नष्ट करून त्या जागेवर ही आदिना मशीद बांधली आहे. या मशिदीमध्ये देखील हिंदू मंदिरातील परंपरेनुसार अनेक खुणा आहेत.

– जामी मशिद, पाटन, गुजरात

गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील जामी मशीद ही रुद्र महालय मंदिर तोडून बांधली आहे. बाराव्या शतकात गुजरातचे राजे सिद्धराज जयसिंह यांनी रुद्र महालय मंदिर बांधले होते. अलाउद्दीन खिलजीने या मंदिरावर हल्ला करून रुद्र महालय मंदिर आणि सर्व परिसर नष्ट केला होता या मंदिरात काही हिस्सा वापरूनच जामी मशीद बांधण्यात आली आहे.

या सर्व मंदिर – मशीद वादाचे वैशिष्ट्य असे की आजही हे परिसर आणि संबंधित मशिदी येथे हिंदू मंदिरांच्या खुणा सापडतात. भारतीय पुरातत्व खात्याने जर येथे सर्वेक्षण केले तर यातील सर्व ऐतिहासिक तथ्य नक्की बाहेर येईल.

Need for archeological survey of 10 major mosques across the country including Jnanvapi Mosque

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात