वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाहीन बाग 28 एप्रिल रोजी तब्बल 400 कोटींची ड्रग्स पकडल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीत तब्बल 434 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. केंद्रीय महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई केली असून परदेशातून कार्गो विमानाने हा साठा दिल्लीत पोहोचला होता. एकूण 54 किलो एवढा हिरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 434 कोटी रुपयांची आहे. Drugs worth Rs 400 crore seized from Shaheen Bagh, heroin worth Rs 434 crore seized in Delhi
कार्गो एअर मधून कुरियरने हे हेरॉईन पोचणार असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीवर आधारित गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट राहून कारवाई केली. यात 54 किलो हेरॉईनचा साठा सापडला.
28 एप्रिल नंतरची दिल्लीतली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 28 एप्रिलला शाहीन बागेतून तब्बल 400 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त केली होती. त्यानंतर आता 434 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
– शाहीन बाग ड्रग्सचा अड्डा
सीएए विरोधातील आंदोलनात चर्चेत आलेली शाहीनबाग आता ड्रग्स माफियांचा अड्डा असल्याचे स्पष्ट झाले. ११ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० या कालावधीत दिल्लीतील मुस्लिम समाजातील शेकडो कुटुंबांनी शाहीन बाग रस्त्यावर बेमुदत ठिय्या मांडला होता. सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिमांनी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी या भागाचा राजकीय वापर केला, आज तोच भाग पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी 50 किलो ड्रग्ज आणि 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
The Directorate of Revenue Intelligence has seized 62kg Heroin, valued at Rs 434 crores in the illicit market. This is one of the biggest seizures of Heroin till date through courier, cargo, air passenger modes in India: Directorate of Revenue Intelligence — ANI (@ANI) May 11, 2022
The Directorate of Revenue Intelligence has seized 62kg Heroin, valued at Rs 434 crores in the illicit market. This is one of the biggest seizures of Heroin till date through courier, cargo, air passenger modes in India: Directorate of Revenue Intelligence
— ANI (@ANI) May 11, 2022
या भागातून नोटा मोजण्याची मशीनदेखील हस्तगत करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे 400 कोटी रुपये होती. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते. इंडो-अफगाण सिंडिकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानातून आणण्यात आलेले हेरॉईन फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद होते.
अफगाणिस्तान पाकिस्तानात धागेदोरे
या सिंडिकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत जात असल्याचे समजते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात छापे टाकण्यात आले. ड्रग्ज तस्करीच्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश आले. या सिंडिकेटमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App