खासदार संभाजीराजेंना भवानी मंदिर गाभाऱ्यात प्रवेशापासून रोखले; आज तुळजापूर बंद!!


प्रतिनिधी

तुळजापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. याच्या निषेधार्थ आज गुरुवारी तुळजापूर बंद पुकारला आहे. MP Sambhaji Raje was barred from entering the Bhavani temple premises

छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून गुरुवारी, १२ मे रोजी सकल मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांनी संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.



– मूर्तीची झीज होत असल्याने गाभाऱ्यात जाण्यास बंदी

देऊळ कवायतमध्ये एक नियम आहे, हा नियम याच्या आधीपासून होता. मात्र विद्यमान जिल्ह्याधिकाऱ्यांनी जे तुळजापूर मंदिराचे प्रशासकीय प्रमुख देखील आहेत, त्यांनी मूर्तीची झीज होत असल्याने याच्या संवर्धनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी घातली आहे. त्यांनी याआधी देखील मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून लोकप्रतिनिधींना रोखले होत. तेव्हाही काही वाद झाले होते.

मात्र तुळजाभवानी आणि कोल्हापूर यांचे नाते काही वेगळे आहे. कोल्हापूर संस्थान मंदिरात काही पारंपरिक विधी करते. हे खूप आधीपासून चालत आहे. अशातच ही घटना घडली तेव्हा हा वाद समंजस्याने मिटेल, असे बोलले जात होते. ही घटना घडल्यानंतर मंदिर संस्थानने दिलगिरीही व्यक्त केली. मात्र ही भूमिका पुरेशी नाही, असे सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत ठरल्यामुळे, तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

MP Sambhaji Raje was barred from entering the Bhavani temple premises

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात