महापालिका, झेडपी निवडणुका टाळण्याकडे कल; निवडणूक मुदतवाढीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला विनंती


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोग त्यानुसार कामाला लागला असून, त्यांनी आता राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत. Maharashtra Election Commission’s request to Supreme Court for extension of election term

मात्र प्रभाग रचनेला वेळ लागतोय. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पावसाळा येईल. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत विविध अडथळे वाढतील. सबब निवडणूक सप्टेंबर – ऑक्टोबर 2022 म घेण्याची परवानगी द्यावी असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला आहे.

ठाकरे – पवार सरकारचा आधीच निवडणूक टाळण्याकडे कल आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणात घोळ घातला गेला. आता सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण टाळून निवडणूक घेण्याचे आदेश आल्यावर पावसाळ्याचे कारण पुढे करत निवडणुका टाळण्याकडे कल दिसून येत आहे.



11 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करावे. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील महापालिका निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात होत आहे.

राज्यातील एकूण 14 शहरांतील महापालिका निवडणुका या प्रलंबित आहेत. यामध्ये मुंबईसारख्या अनेक महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन तारखा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 11 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करुन, 12 मे पर्यंत त्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावा. 17 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दोन टप्प्यांत होणार निवडणुका?

या महापालिका निवडणुका या दोन टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस आणि निवडणुकीसाठी कर्मचा-यांवर येणारा ताण यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले जात आहे. ज्या महापालिकांची मुदत संपून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, तर इतर महापालिका निवडणुका दुस-या टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात निवडणुकीसाठी मुदतवाढ मागितल्याने आता कोर्ट नेमका काय निर्णय देते?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

14 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित

मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या 14 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत.

Maharashtra Election Commission’s request to Supreme Court for extension of election term

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात