हुंडाबळी : उत्तरप्रदेश मधील मन दुःखी करणारी घटना, घरातील इतर सदस्यांसमोर स्त्रीला मारहाण, पीडित स्त्रीचे निधन


विशेष प्रतिनिधी

बुलंदशहर : सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला तिचा नवरा आणि सासरचे लोक अमानवीयरित्या मारताना दिसून येत आहेत. या घटनेचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये त्या मुलीचा पती तिला मारतो आहे. तिच्या तोंडातून रक्त येत आहे. रक्त तिच्या अंगावर पडलेले आहे. हे स्पष्ट दिसते आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती बेडवर पडलेली आहे. आणि साइडने आवाज येतोय की ती तिला मारू नका.

Dowry Victim : Tragic incident in Uttar Pradesh, woman beaten in front of other family members, victim dies

तर या व्हिडिओमध्ये ज्या मुलीवर अत्याचार होत आहेत त्या मुलीचे निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नक्की कोण शूट केलाय हे अजुनही कन्फर्म कळालेले नाहीये. जर मुलीच्या नातेवाईकांनीच्या घरी ही घटना घडली होती, तर तिच्यावर अत्याचार होत असताना नातेवाईकांनी का थांबवले नाही. हा प्रश्न देखील पोलिसांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांवर हुंडाबळीचा आणि खुनाचा खटला दाखल केला आहे. हशीम असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. मात्र या प्रकरणात अजूनही कोणतीही अटक करण्यात आलेली नाहीये.


राजस्थान मधील या नवरीने आपल्या लग्नात मिळालेल्या हुंड्याची रक्कम दिली मुलींच्या हॉस्टेल बांधकामासाठी


देश प्रगत झाला. स्त्री शिकतेय. पुढे जातेय. हे सर्व चालू असताना, देशातील प्रचंड मोठी स्त्रियांची संख्या आजही हुंडाबळीचा शिकार होताना आपण पाहतोय. बऱ्याच स्त्रिया आजही सासरच्या लोकांकडून पैशांसाठी केले जाणारे अत्याचार सहन करतात. ‘नवरा म्हणजे तुमचे सर्वस्व’ अशी शिकवण मुलींना लहानपासून मिळालेली असताना, अचानक स्वतःच्या पायावर उभे असे राहायचे? आयुष्याला सामोरे कसे जायचे? असे बरेच प्रश्न पीडित स्त्रीला पडत असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तेव्हा स्त्रिया अन्याय सहन करत राहतात. अन्याय सहन करण्याची बाकी बरीच कारणे आहेत. पण अशा प्रकारच्या घटना थांबण्यासाठी स्त्रीला स्वतंत्र आणि मजबूत विचार करायला शिकवणे खूप जास्त गरजेचे आहे.

Dowry Victim : Tragic incident in Uttar Pradesh, woman beaten in front of other family members, victim dies

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात