WATCH : मुंबईत अधिवेशन म्हणजे विदर्भावर अन्याय आमदार प्रताप अडसड यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

अमरावती : हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत येथे घेण्यात येणार असल्याच सांगितले. त्यामुळे विदर्भावर एकप्रकारे अन्याय झाल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे.The convention in Mumbai is an injustice to Vidarbha

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विदर्भात फक्त एकदाच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले. हा विदर्भावर एकप्रकारे अन्याय केल्यासारखं होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.असे असताना महाविकास आघाडी सरकारच विदर्भावर लक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथेच घ्यावे. मुंबई येथे घेण्यात येत असलेल्या अधिवेशनाचा प्रताप अडसड यांनी निषेध केला.

मुंबईत अधिवेशन म्हणजे विदर्भावर अन्याय

– एकदाच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले

– विदर्भात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक

– शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित

– महाविकास आघाडी सरकारच विदर्भावर लक्ष नाही

The convention in Mumbai is an injustice to Vidarbha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात