राजस्थान मधील या नवरीने आपल्या लग्नात मिळालेल्या हुंड्याची रक्कम दिली मुलींच्या हॉस्टेल बांधकामासाठी


विशेष प्रतिनिधी

बारमेर : असं म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली. जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा ती आपल्या सोबतच्या लोकांना देखील शिकवत असते. नुकताच राजस्थानमध्ये एक सुखद घटना घडली आहे. हुंडा पद्धतीला कितीही विरोध होत असला तरीही, भारतामध्ये हुंडा देण्याची प्रथा आजही सुरू आहेच. राजस्थानमधील बारमेर या गावातील एका मुलीने आपल्या लग्नात मिळालेली हुंड्याची रक्कम मुलींचे गर्ल्स हॉस्टेल बनवण्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणि तिच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

The bride from Rajasthan paid her dowry for the construction of a girls’ hostel

किशोर सिंग कनोड यांची मुलगी अंजली कनवार ही बारमेर सिटीमध्ये राहते. 21 नोव्हेंबर रोजी ती प्रवीण सिंग यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. विवाहाच्या दिवशी तिने आपल्या वडिलांकडे इच्छा व्यक्त केली की तिच्या हुंड्याची रक्कम मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी वापरली जावी. NH69 वर सुरू असलेल्या हॉस्टेलच्या कन्स्ट्रक्शनसाठी तिच्या हुंड्याची रक्कम देण्यात यावी अशी तिने इच्छा व्यक्त केली. तिच्या या निर्णयाचे तिच्या वडिलांनी कौतुक तर केलेच शिवाय तिच्यासमोर एक रिकामा चेक ही धरला आणि म्हणाले तुला हवी ती रक्कम यामध्ये लिही.


कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी


अंजलीच्या वडिलांनी या आधीही त्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी 1 करोड रुपयांची देणगी दिली होती. पण कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी जवळपास 50 ते 75 लाखाची किंमत अपुरी पडत होती. अंजलीला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तिने आपल्या हुंड्याची रक्कम या हॉस्टेलच्या बांधकामासाठी देण्याचा निर्णय घेतला.

दैनिक भास्करसोबत बोलताना अंजली म्हणते की, माझ्या वडिलांनी मला नेहमीच माझ्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला आहे. जेव्हा मी शिकते तेव्हा माझ्यासोबतच्या मुलींनीही शिकावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला.

The bride from Rajasthan paid her dowry for the construction of a girls’ hostel

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण