केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले, तब्बल ११ क्विंटल फुलांनी सजवले मंदिर


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. हिवाळ्यामुळे ते बंद करण्यात आले होते. कोरोना संसर्गामुळे उद्‌घाटनपर कार्यक्रमाला निवडक जणांची उपस्थिती होती. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे नुकतेच उघडण्यात आले. मात्र, कोरोना संसर्गामुळे भाविकांना सध्या प्रवेश दिला जात नाही. Doors open of Kedarnath Temple

सोमवारी पहाटे पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने पुजाऱ्यांनी मंदिरात पहिली पूजा केली. मंदिर ११ क्विंटल फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आले होते.



दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांचा हिरेमोड झाला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी मात्र अद्याप बंदच आहेत. आजच्या उद्‌घाटनपर कार्यक्रमाला मुख्य पुजारी बगेश लिंग यांच्यासह इतर पुजारी व देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आाला.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आनंद व्यक्त केला. लोकांच्या आरोग्यासाठीही त्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर चारधाम यात्रा सुरू करण्यात येईल, असे उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांनी सांगितले.

Doors open of Kedarnath Temple

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात