ज्यो बायडेन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प भडकले, अफगाणच्या माघारीवरून घेतले तोंडसुख

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासात एवढ्या वाईट पद्धतीने अथवा अकार्यक्षमेते युद्धातून माघार घेताना कधीही घेतलेली नव्हती, अशा शब्दांत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. Donald Trump targets Jo Biden once again

ते म्हणाले, तालिबानने अमेरिकेला शस्त्रे परत केली नसली तरी आपण सैन्यदलाच्या मदतीने ती मिळवायला हवीत किंवा किमान बाँब फेकून ती नष्ट करायला हवी होती.अमेरिकेच्या इतिहासात अशा प्रकारे कधीही युद्धातून माघार घेण्यात आली नव्हती. तेथे असलेली सर्व शस्त्रेही तातडीने अमेरिकेत आणायला हवी होती. त्यावर अमेरिकेने ८५ अब्ज डॉलर खर्च केला आहे. ही शस्त्रे परत मिळाली नसली तरी आपण ती सैन्यदलाच्या मदतीने ती मिळवायला हवीत किंवा किमान बाँब तरी फेकायला हवा होता. अमेरिकेची ही लज्जास्पद माघार आहे. त्यांनी अमेरिकी नागरिक व अफगाणी सहकाऱ्यांना दहशतवादी सरकारच्या ताब्यात सोडले आहे.

Donald Trump targets Jo Biden once again

महत्त्वाच्या बातम्या