सरकारलाच हिंसाचार हवा आहे का? पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचा सवाल


हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच पाउले उचलताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहून, सरकारला हिंसाचार हवा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीवरुन असे दिसत आहे की, राज्यात संविधानाचा अंत झाला आहे. मला रात्री राज्यात हिंसा घडल्याच्या बातम्या मिळता, पण सकाळी सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले जाते, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे. Does the government want violence? Question from West Bengal Governor Jagdeep Dhankhad


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच पाउले उचलताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहून, सरकारला हिंसाचार हवा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीवरुन असे दिसत आहे की, राज्यात संविधानाचा अंत झाला आहे. मला रात्री राज्यात हिंसा घडल्याच्या बातम्या मिळता, पण सकाळी सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले जाते, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे.

राज्यपाल धनखड म्हणाले, सरकारने राज्यातील परिस्थिती समजून घ्यावी आणि जनतेच्या मनात विश्वास स्थापन करावा. जे लोक लोकशाही विरोधी काम करत आहेत, अशा लोकांवर सरकारने कडक कारवाई करावी. आतापर्यंत सरकारने कठोर कारवाई केली नाही. सरकारमध्ये उत्तरदायित्व दिसले नाही.

मी कोलकाता पोलिस, प्रशासन आणि अधिकाऱ्यांना 3 मे रोजी रिपोर्ट मागितली होती. त्याच दिवसी राज्याच्या मुख्य सचिवांना परिस्थिती सुधारण्यासाठी आढावा घेण्यास सांगितले होते. पण, अजूनही माझ्यापर्यंत कोणताच रिपोर्ट आला नाही. मला मुख्य सचिवांना फोन करुन बोलवावे लागले. चीफ सेक्रेटरी मला भेटण्यासाठी आले, पण त्यांच्याकडे कुठलाच रिपोर्ट आणि माहिती नव्हती. मला रिपोर्ट का दिली नाही, याचे कारणही त्यांनी मला सांगितले नाही. गृह सचिवांनी आपली ड्युटी का केली नाही. ते दोघे माझ्याकडे फक्त हजेरी लावण्यासाठी आले होते.हिंसाचारग्रस्त भागात भागांमध्ये जाण्यासाठी राज्य सरकारला हेलिकॉप्टरची मागणी केली होती. पण, त्यांनी मला हेलिकॉप्टर दिले नाही. मला त्यांनी रायटींगमध्ये याचे कारण सांगायला हवे होते. पण, फक्त तोंडी सांगण्यात आले की, हेलिकॉप्टर खराब आहे. राज्याच्या संविधानिक प्रमुखाला तुम्ही अशी वागणूक देता ? मी तुम्हा सर्वांना आणि विशेषत: माध्यमांना सांगू इच्छितो की, ही निवडणुकीनंतर होणारी ऐतिहासिक हिंसा आहे आणि बंगालने गुन्हेगारी चरित्र स्विकारले आहे. अनेक दिवसांपासून अनेकांचे मृत्यू होत आहेत, बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत.

महत्वाचे म्हणजे, विरोधी उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आणि त्यांना मतदान देणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागत आहे. मी राज्यातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी राज्य सरकारला अपील करतो की, त्यांनी मला राज्यातील परिस्थिती सांगावी. मला काहीच सांगितले जात नाहीये. सध्या संविधानाच्या विरोधात काम सुरू आहे. मला राज्याला संविधानानुसार चालवणे अवघड जात आहे, असा आरोप धनखड यांनी केला.

Does the government want violence? Question from West Bengal Governor Jagdeep Dhankhad

इतर  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण