कानपुरात ओमिक्रॉनबाबतच्या भीतीने नैराश्यातून डॉक्टरने कुटुंबच संपविले


विशेष प्रतिनिधी

कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात एका डॉक्टरने आपले कुटुंबच संपविले. पत्नी, एक मुलगा आणि मुलीचा घरातच शुक्रवारी सायंकाळी खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. नैराश्याउतून डॉक्टरने हत्याकांड घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे.Doctor killed his own family due to corona

आरोपी डॉक्टरने मृतदेहावर चिठ्ठी ठेवली असून नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन आल्याने आता आपल्याला मृतदेह मोजायचे नाहीत, असे म्हटले आहे. दरम्यान आरोपी फरार असून घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतून तपास केला जात आहे.



डॉ. सुशील कुमार हे कानपूरच्या इंद्रानगरच्या डिव्हिनिटी अपार्टमेंटमध्ये राहत होते. पत्नी चंद्रप्रभा (वय ४८), मुलगा शेखर (वय १८) आणि मुलगी खुशी (वय १६) असे त्यांचे कुटुंब होते. काल सायंकाळी डॉ. सुशील कुमार यांनी भाऊ सुनील यास मेसेज केला. यात म्हटले की, पोलिसांना सूचना दे की मी नैराश्यानतून हत्याकांड घडवून आणले.

हा मेसेज वाचताच सुनील त्यांच्या घरी पोचला. दरवाजा आतून बंद होता. नंतर तो तोडण्यात आला. आत पाहिले तर सर्वांना धक्काच बसला. चंद्रप्रभा, शेखर आणि खुशी यांचे मृतदेह सापडले. पोलिसांच्या मते, डॉक्टरांनी अगोदर पत्नीच्या डोक्यावर वजनदार वस्तूने मार केला आणि नंतर हत्याकांड घडवून आणले.

डॉक्टर सुशील आणि सुनील हे जुळे भाऊ आहेत. त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत ओमिक्रॉन असे लिहले असून आता मृतदेह मोजायची नाहीत, असे म्हटले आहे.

Doctor killed his own family due to corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात