अफगाणिस्तानच्या मनोरंजन माध्यमावर बंदी घालण्यास तालिबानची सुरुवात


विशेष प्रतिनिधी

काबूल – पंधरा ऑगस्टला काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडून मानवाधिकारांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. आता तालिबानने अफगाणिस्तानच्या मनोरंजन माध्यमावर बंदी आणण्याची तयारी सुरू केली आहे.Taliban firm to strict regarding entertainment

यासाठी कडक नियम लागू केले आहेत. अफगाणिस्तानात गेल्या पंधरा वर्षात मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध झालेली असताना आता ते हळूहळू नष्ट करण्याचे काम केले जात आहेत.



तालिबानच्या कडक नियमानुसार संगीत रजनीच्या आयोजनावर, संगीत साहित्य बाळगण्यावर आणि रात्रीच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानकडून लवकरच शरियत कायदा लागू करण्याची शक्यता आहे.

काबूलसह अनेक शहरात एअरवेब, टिव्ही स्क्रीन, संगीत शाळा, चित्रपटगृहे बंद झाली आहेत. मागच्या राजवटीत तालिबानने हिंसेचा मार्ग अवलंब करत संगीत साहित्य नष्ट केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना चाबकाचे फटके दिले होते.

त्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिकांनी कॅसेट आणि सिडी घरातच लपवून ठेवल्या. परंतु तालिबानच्या झाडाझडतीत कॅसेट आढळल्यानंतर त्यांना कठोर शिक्षा दिल्याचे प्रकार घडले.

अफगाणिस्तानवर देखरेख करणाऱ्या अनेक तज्ञाच्या मते, तालिबानच्या स्वभावात कोणताही बदल झालेला नाही. तालिबान पुन्हा आपली जुनीच राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

Taliban firm to strict regarding entertainment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात