३७० ची पुन्हा बहाली; दिग्विजय सिंगांच्या क्बल हाऊस चॅटवर फारूख अब्दुल्ला खूश; भाजपकडून तिखट वार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – बरेच दिवस राजकीय विधान न करता शांत असलेले दिग्विजय सिंग यांनी तोंड उघडले आणि देशात वाद सुरू झाला आहे. Digvijaya Singh Ji. He has realized sentiments of people as other parties who have also spoken about it. I welcome it heartily & hope govt will look into it again

केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास जम्मू – काश्मीरमधून हटविलेले ३७० कलम पुन्हा लागू करण्यात येईल, या काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्या क्बल हाऊस चॅटमधील विधानाचे फारूख अब्दुल्लांनी जोरदार स्वागत केले आहे. भाजपने मात्र, त्यावर अपेक्षेप्रमाणे तिखट वार केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊसमधील चॅटदरम्यान म्हटले की, कॉंग्रेसची सत्ता आल्यास ते जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० पुन्हा बहाल करण्याचा विचार करतील. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आले तेव्हा तिथे लोकशाही सरकार नव्हते. तिथे इन्सानियत नव्हती. काश्मीर हे मुस्लीम बहूल असताना हिंदू राजा असणे हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते. काश्मिरीयतचे प्रतिक होते. त्या काश्मिरितयला ३७० हटवून त्यांनी धक्का लावला आहे, असा दावा दिग्विजय सिंग यांनी केला होता. या क्लब हाऊस चॅटमध्ये एक पाकिस्तानी पत्रकारही होता, असा दावा केला जात आहे.



मात्र, द्ग्विजय सिंग यांच्या वक्तव्याचे जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी स्वागत केले आहे. दिग्विजय सिंग यांनी काश्मीरी जनतेचे मनोगत ओळखले आहे. बाकीच्या पक्षांनीही ३७० कलम हटविण्याला विरोध केला आहे. सरकारने जरूर त्याचा फेरविचार करावा.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी मात्र, दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दिग्विजय सिंग हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ३७० कलमाचे पाकिस्तानने समर्थन केले आहे. त्यांना राज्यात पुन्हा ते कलम लागू करून हवे आहे. कारण त्यातून त्यांना राज्यात फुटीरतावादी शक्तींना पुन्हा बळ द्यायचे आहे. काँग्रेसी टूलकिटचाच हा एक भाग आहे, अशी टीका कविंदर गुप्ता यांनी केली आहे.

Digvijaya Singh Ji. He has realized sentiments of people as other parties who have also spoken about it. I welcome it heartily & hope govt will look into it again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात