स्वातंत्र्यदिनी घातपाताचा कट दिल्ली पोलिसांनी उधळला; दारुगोळ्यासह 2000 जिवंत काडतुसे जप्त; 6 जणांना अटक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 2000 जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी या तस्करीत सामील असलेल्या 6 जणांना अटक केली आहे. Delhi Police foiled an assassination plot on Independence Day

दारुगोळ्यासह 2000 जिवंत काडतुसे जप्त

दिल्ली पोलिसांनी काडतुसे पुरवणाऱ्या 6 आरोपींना ताब्यात घेत 15 ऑगस्टपूर्वी पटपटगंज या भागात ही मोठी कारवाई केली आहे. आनंदविहारच्या मेट्रो स्टेशनजवळील बस स्टॅंडवर ही जिवंत काडतुसं आढळली होती. पोलिसांच्या पथकाला याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी आयबीने एक अहवाल जारी करून दिल्ली पोलिसांना सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश दिले होते. आयबीने गुप्तचर अहवालात सांगितले होते की दहशतवादी 15 ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ला करू शकतात. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दिल्ली पोलिसांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार उत्तरेकडील जिल्हा आणि मध्यवर्ती जिल्ह्यात लाल किल्ल्याच्या परिघात मोठ्या प्रमाणात कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे आयपी-आधारित फेस डिटेक्शन, पीपल मूव्हमेंट डिटेक्शन, ट्रिपवायर, ऑडिओ डिटेक्शन, इंट्रुजन, डिफोकस इत्यादी वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील.

Delhi Police foiled an assassination plot on Independence Day

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!