प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली. Direct election of 608 gram panchayats and sarpancha in Maharashtra
सुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली.
संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २४ ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येतील. २ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असेही सांगण्यात आले.
असे होईल मतदान
१८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १९ सप्टेंबरला होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.
जिल्हानिहाय ग्रामपंचायती
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App