काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग : बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या मोहम्मद अमरेजवर झाडल्या गोळ्या


वृत्तसंस्था

बांदीपोरा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका सामान्य नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. हे प्रकरण खोऱ्यातील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील सदुनारा भागाशी संबंधित आहे.Another Target Killing in Kashmir Bihar’s Mohammed Amaraj fired by terrorists in Bandipora

दहशतवाद्यांनी गुरुवारी एका बिगर स्थानिक मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. रात्री 12.30 च्या सुमारास अतिरेक्यांनी या मजुरावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर मजुराला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मद जलील असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे.सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला

बांदीपोरामध्ये स्थानिक नसलेल्या नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील अजस तहसीलमधील सदुनारा गावात ही घटना घडली. 19 वर्षीय मोहम्मद अमरेज असे या मजुराचे नाव आहे. अमरेज हा मधेपुरा जिल्ह्यातील बेसड गावचा रहिवासी होता. तो बिहारहून येथे कामासाठी आला होता.

दहशतवाद्यांचा गैर-काश्मिरी लोकांना इशारा

खोऱ्यात गैर-काश्मिरींवर दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी एका गैर-काश्मीरी व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्यांना खोऱ्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे बिगर काश्मिरी लोकांची हत्या करून दहशतवादी तेथे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्थानिक नसलेल्या नागरिकांमध्ये घबराट

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या या घटनांमुळे सरकारी कर्मचारी आणि तिथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून घाटीत अशा टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खोऱ्यातील बिगर काश्मिरी लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे या लोकांचे पलायनही तेथून सुरू झाले होते.

Another Target Killing in Kashmir Bihar’s Mohammed Amaraj fired by terrorists in Bandipora

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था