मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागो, खाते वाटपाला उशीर होवो; पण पक्षांचे संघटनात्मक काम जोरावरच!!


विनायक ढेरे

“भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार”, “वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामं करा; माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र” आणि मुंबईत उभ्या राहत आहेत शिंदे गटाच्या प्रति शाखा”, ही तीन बातम्यांची तीन शीर्षके आहेत. या बातम्या नेमक्या कोणत्या गोष्टीकडे अंगुली निर्देश करतात, तर महाराष्ट्र आता 100 % निवडणुकांच्या दिशेने निघाला आहे. केवळ महापालिकांच्या नव्हे, तर कदाचित विधानसभांच्याही… हेच यातून ठळकपणे सूचित होताना दिसते आहे. केवळ वर उल्लेख केलेल्या शीर्षकांच्या बातम्याच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम पक्ष फोडून 8 नगरसेवक राष्ट्रवादीत घेणार, काँग्रेस पक्ष आता महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, या बातम्या देखील निवडणुकांची दिशा स्पष्ट करत आहेत. Thackeray, Shinde faction and BJP very much ahead in building organisational works of their own parties

महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब लागो, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही अजून खातेवाटप व्हायला उशीर होवो, त्याचा सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपला काही फरक पडत नाही.

कारण भाजपने आपला प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलून म्हणजे संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल करून आक्रमक पाऊल उचलले आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या एका दिवसाचा आजारपणाचा अपवाद वगळता दररोज कोणत्या ना कोणत्या तरी आपल्या गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन मेळावा घेत आहे आपल्या बंडखोरीची राजकीय ओळख ठळक करत आहेत त्याचाच पुढचा भाग म्हणून मुंबईत आता शिवसेनेच्या शाखांच्या धरतीवर शिंदे गटाच्या प्रतिशाखा उभ्या करण्याचा त्यांचा मनसुबा आहे किंबहुना त्यांचे काम सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे देखील या पार्श्वभूमीवर गप्प बसलेले नाहीत त्यांनी शिंदे गटाला कार्डशह देण्यासाठी मातोश्रीवर बसूनच संघटनात्मक कामाचा धडाका लावला आहे.

ठाकरेंच्या घरी माजी नगरसेवकांची बैठक

मुंबईत शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेशही दिले. ही महापालिका निवडणूक तुमच्या जीवावर जिंकणार आहे. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामं करत राहा. वॉर्डमध्ये फिरा, असा कानमंत्र देखील त्यांनी माजी नगरसेवकांना दिला. जे कोणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्याला पर्वा नाही.

सातत्याने जनतेची कामं करा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला देखील उद्धव ठाकरेंनी दिला आहे. याचा दुसरा अर्थ असा की उद्धव ठाकरे यांना आता आपणच कधीमधी तिकीटे नाकारलेल्या नगरसेवकांची अथवा नगरसेवक पदाच्या स्पर्धेतल्या उमेदवारांची आठवण झाली आहे आणि त्यामुळेच त्यांना उरलेल्या नगरसेवकांना ते तिकिटाची अशा बैठकांमधून खात्री देत आहेत.

या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कोणाच्या अमिषाला बळी पडू नका, असा सल्ला देखील माजी नगरसेवकांना दिला आहे. गुरूवारी दुपारनंतर या बैठकीचे निरोप देण्यात आले होते. यावेळी १३ माजी नगरसेवक अनुस्पस्थित होते. जे आज अनुपस्थित होते, त्या सगळ्यांनी त्यांची कारणे पक्षाला कळवली होती, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. या बैठकीला सर्व माजी नगरसेवकांना कामाला लागा, असा मंत्रच दिला असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

ठाकरे गटाची न्यायालयात जाण्याची तयारी

२०१७ ची वॉर्ड रचना कायम ठेवण्याचे आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला विरोध करत शिवसेना न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा आरक्षणे बदलण्याचीही शक्यता आहे. यामुळे पुन्हा एखदा निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यताही आहे. अशा परिस्थितीत या नव्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. तर मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न असण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या उभ्या राहणार प्रतिशाखा

एका बाजूला शिंदे गट दादर येथे शिवसेना भवनाच्या बाजूलाच स्वतःचे मुख्यालय उभारणार आहे, तसेच मुंबई, महामुंबईसह राज्यभर कार्यालये उभारून एकप्रकारे प्रति शाखा उभारणार आहे, अशी घोषणाच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे सामान्यांना भेटणार 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेवर दावा ठोकला आहे. हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे मात्र शिंदे गटाने समांतर शिवसेना स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी दादर येथे जिथे शिवसेना भवन आहे, त्याच्याच जवळ शिंदे गट मुख्यालय उभारणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बसून नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. या कार्यालयाची जागा निश्चित झाली आहे, येत्या १५ दिवसांत हे कार्यालय सुरु होणार आहे. तसेच मुंबई, महामुंबईसह राज्यभर ठिकठिकाणी शिंदे गटाची कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे, असेही आमदार सरवणकर म्हणाले. पण शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिराच्या समान आहे, मात्र आज आम्ही तिथे बसून नागरिकांच्या समस्या सोडवू शकत नाही, त्यामुळे शिंदे गटाने प्रतिशाखा उघडून या प्रतिशाखांमधून आपले संघटनात्मक बांधणी करायचा निर्णय घेतला आहे.

Thackeray, Shinde faction and BJP very much ahead in building organisational works of their own parties

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात