महाराष्ट्र – मुंबईत भाजपचे नवे कॅप्टन्स; प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळे, तर आशिष शेलार भाजपा मुंबई अध्यक्ष!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताच दोनच दिवसांत महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरफार करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा भाजपामध्ये महत्वाचा संघटनात्मक बदल करण्यात आला आहे. BJP’s new captains in Mumbai; Bawankule is the state president, while Ashish Shelar is the BJP Mumbai president

प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी चेहरा

दिल्लीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. याआधीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांनी भाजपाला मोठे यश मिळवून दिले होते. प्रदेशाध्यक्ष पदी आशिष शेलार आणि राम शिंदे यांची नावे चर्चेत होती, मात्र या पदासाठी भाजपाने ओबीसी चेहरा निवडला आहे.



महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलारांची निवड

२०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जोरदार टक्कर देत भाजपाने मुंबई महापालिका लढवली होती आणि मोठे यश मिळवले होते. त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाली आहे. शेलार हे मराठा समाजाचा चेहरा आहे. तसेच शहरी ओळख असून मुंबई महापालिकेचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपाच्या नियमानुसार या दोघांनाही एक व्यक्ती एक पद या नियमानुसार त्यांना मंत्री पद दिले जाणार नाही.

मुख्यमंत्री पदी मराठा समाजाचा चेहरा आहे, तर उपमुख्यमंत्री पदी ब्राह्मण चेहरा आहे, अशा वेळी भाजपाने प्रदेशाध्यक्ष पदी विदर्भातील ओबीसी चेहरा देत जातीय आणि भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP’s new captains in Mumbai; Bawankule is the state president, while Ashish Shelar is the BJP Mumbai president

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात