Delhi HC issues notice to Imran Hussain : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आप सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. दुसरीकडे, आपचे मंत्री इमरान हुसेन हे मात्र ऑक्सिजनची साठेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधाने दिल्लीच्या हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे, यावर हायकोर्टाने आप आमदाराला नोटीस बजावली आहे. Delhi HC issues notice to Imran Hussain on the petition concerning alleged illegal hoarding of oxygen cylinders
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आप सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. दुसरीकडे, आपचे मंत्री इमरान हुसेन हे मात्र ऑक्सिजनची साठेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधाने दिल्लीच्या हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे, यावर हायकोर्टाने आप आमदाराला नोटीस बजावली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली सरकारचे मंत्री इमरान हुसेन यांना ऑक्सिजनचा साठा करण्यावरून नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने याप्रकरणी केजरीवाल सरकारलाही जाब विचारला आहे. शनिवारी खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपचे आमदार हुसेन यांना वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे आदेश न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
Delhi HC issues notice to Imran Hussain on the petition concerning alleged illegal hoarding of oxygen cylinders. High Court says Imran Hussain will remain present in the court tomorrow. — ANI (@ANI) May 7, 2021
Delhi HC issues notice to Imran Hussain on the petition concerning alleged illegal hoarding of oxygen cylinders. High Court says Imran Hussain will remain present in the court tomorrow.
— ANI (@ANI) May 7, 2021
खंडपीठाने म्हटले आहे की, आमदार हुसेन यांना ऑक्सिजन कोठून मिळतो हे पाहणे आवश्यक आहे, कारण गुरुद्वाराही ते गरजू (ऑक्सिजन) मध्ये वितरित करत आहेत. हायकोर्टाने म्हटले आहे की, आमदार फरीदाबादहून ऑक्सिजन आणत असतील. खंडपीठाने असेही म्हटले आहे की, जर ते दिल्लीला देण्यात आलेल्या कोट्यातून ऑक्सिजन घेऊन जात नसतील आणि आपल्या सिलिंडरची व्यवस्था केली असेल तर तुम्हाला (याचिकाकर्त्याला) खरोखर अडचण येऊ नये. यावर हुसेन यांची ऑक्सिजनच्या वितरणासंदर्भात एक फेसबुक पोस्ट याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडली आणि त्याच्यावर ऑक्सिजन साठा केल्याचा आरोप केला.
यावर दिल्ली सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील राहुल मेहरा यांनी हायकोर्टाला आश्वासन दिले की, ऑक्सिजन, औषधोपचार किंवा वैद्यकीय उपकरणांची साठेबाजी आणि काळ्या बाजारामध्ये विक्री यात दोषी आढळलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. मेहरा यांनी खंडपीठाला सांगितले की, कोणी साठेबाजी करणारा कोणीही असो, दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Delhi HC issues notice to Imran Hussain on the petition concerning alleged illegal hoarding of oxygen cylinders.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App