देशातील डेअरी उद्योगाची सुसाट प्रगती, 6 वर्षांत 44 टक्क्यांनी वाढले दुधाचे उत्पादन

Dairy industry Progress, milk production increased by 44% in 6 years

Dairy industry Progress : केंद्र सरकारने पशुसंवर्धन आणि दुग्ध क्षेत्राला चालना देण्यासाठी मिशन मोडमध्ये राबविल्या गेलेल्या योजना आणि कार्यक्रमांमुळे देशातील दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांना पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी डेअरी क्षेत्राची यशोगाथा राबवायची आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध सचिव अतुल चतुर्वेदी यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत दुग्धशाळेच्या क्षेत्रात वार्षिक सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्याव्यतिरिक्त जनावरे वार्षिक तुलनेत आठ टक्क्यांनी वाढत आहेत. ही कृषी क्षेत्रापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. Dairy industry Progress, milk production increased by 44% in 6 years


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पशुसंवर्धन आणि दुग्ध क्षेत्राला चालना देण्यासाठी मिशन मोडमध्ये राबविल्या गेलेल्या योजना आणि कार्यक्रमांमुळे देशातील दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांना पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी डेअरी क्षेत्राची यशोगाथा राबवायची आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध सचिव अतुल चतुर्वेदी यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत दुग्धशाळेच्या क्षेत्रात वार्षिक सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्याव्यतिरिक्त जनावरे वार्षिक तुलनेत आठ टक्क्यांनी वाढत आहेत. ही कृषी क्षेत्रापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

डेअरीशी संबंधित शेतकऱ्यांना उत्पादने विक्रीवर बंधन नाही

कृषी क्षेत्रातील जलद वाढीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार सुधारणा करत आहे आणि या दिशेने नवीन कृषी कायदे करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, दुग्धशाळेतील शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विक्री करण्यास कोणतेही बंधन नाही, कारण त्यांना कोणताही मंडी कायदा लागू नाही. चतुर्वेदी म्हणाले की, पीक उत्पादक शेतकऱ्यांना या डेअरीची यशोगाथा पीक उत्पादकांसाठी लागू करण्यासाठी कृषी सुधार कायदे लागू करण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांना त्यांचे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. गेल्या सहा वर्षांत देशातील दुधाचे उत्पादन 44 टक्क्यांनी वाढले आहे, तर अंड्यांच्या उत्पादनात 53 टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध सचिव अतुल चतुर्वेदी यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, गेल्या सहा वर्षांत दुग्ध व पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर आकर्षक आहे आणि शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

काय सांगते आकडेवारी?

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दुग्ध व पशुसंवर्धन क्षेत्राचे अहवाल पाहता 2013-14 मध्ये देशातील दुधाचे उत्पादन 13.7 कोटी टन होते, 2019-20 मध्ये ते वाढून जवळपास 20 कोटी टन झाले आहे. त्याचप्रमाणे 2013-14 मध्ये 74.75 अब्ज अंडी उत्पादन झाले होते, तर 2019-2020 मध्ये 114.38 अब्ज अंडी उत्पादन झाले आहे. चतुर्वेदी पुढे म्हणाले की, एनडीए सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादनात 44 टक्के वाढ झाली, अंड्यांच्या उत्पादनात 53 टक्के वाढ झाली आणि मांसाच्या उत्पादनात 38 टक्के वाढ झाली. ही वाढ हेच दर्शवते की, केंद्र सरकारने राबवलेल्या योजना योग्य प्रकार लागू झाल्या आहेत, यामुळेच पशुसंवर्धन आणि दुग्ध क्षेत्रात आकर्षक वाढ दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था