आमने-सामने : ‘गोत्र‘ व ‘खरेदी’वरून ममता बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवैसी भिडले

विशेष प्रतिनिधी

कूचबिहार : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता निवडणुकीत जातीयवादी राजकारणाचा रंग अधिक गडद होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपलं गोत्र उघड केलं.त्यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ममतांवर हल्लाबोल केला. MIM leader Asaduddin Owaisi attacked Mamata

आता एका रॅलीत ममतांनी औवेसींना डिवचले.बंगालच्या कूचबिहार येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना निवडणुकीत ओवैसी यांचा भाजपला फायदा होत असल्याचे दीदी यांनी म्हटले आहे. कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा येथे संबोधित करताना दीदी म्हणाल्या हैदराबादमधून एक व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी येथे आली आहे.

त्यांनी भाजपकडून पैसे घेतले आहेत आणि भाजपला मदत करण्यासाठी त्यांचा पक्ष एआयएमआयएमने उमेदवार उभे केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना बंगालमध्ये पाय ठेवण्याची परवानगी दिली जाऊ नये.दीदी यांच्या वक्तव्यावर ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक ममता बॅनर्जी नाराज आहेत .ज्या लोकांना गोत्र ​​नाही अशा लोकांना ममता खरेदी करू शकत नाहीत. ज्यांना कसलीही भिती वाटत नाही अशा लोकांना तुम्ही घाबरवू शकत नाही.

तुम्ही बंगालच्या मुस्लिमांसाठी काय केले? बंगालमधील 15 टक्के मुस्लिम औपचारिक शिक्षणापासून दूर आहेत. 80 टक्के लोक 5000 पेक्षा कमी पैशात जगतात. ग्रामीण बंगालमध्ये 38.3 टक्के लोकांचे 2500 रुपये उत्पन्न आहे. त्याच वेळी, तीन चतुर्थांशपेक्षा जास्त मुस्लिमांच्या मालकीची जमीन नाही.

मुस्लिमांना केवळ ममता बॅनर्जींचा विजय हवा नाही तर त्यांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि राजकीय सबलीकरण देखील हवे आहे. तुम्ही मंत्री मुख्यमंत्री इत्यादी झाल्या पण आम्हाला काय मिळाले ?

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप – तृणमुलच्या युद्धात एमआयएम ची एंट्री झालेली आहे .यामुळे आता ममता बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवैसी यांचा आमना सामना होतच राहणार हे नक्की!

MIM leader Asaduddin Owaisi attacked Mamata

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*