West Bengal Election 2021 : ‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममता दिदींवर हल्ला , सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा

  • भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा असे अनेक दिग्गज पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
  • पश्चिम बंगालमध्ये एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन करा, मग टोलाबाजी करण्याची किंवा कट मनी घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, असा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलाय. भाजप सरकारच्या काळात कुणीही कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याची हत्या करु शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा योगी आदित्यनाथ,स्मृती इराणी , विजया रहाटकर असे अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. Defense Minister Rajnath Singh criticizes West Bengal Chief Minister Mamata Banerjee



ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कोलकातामध्ये बसून कट रचला जात असल्याचंही ममता यांनी म्हटलंय. त्यावर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.

‘मां, माटी और मानुष, कुणीही सुरक्षित नाही’

“ममता यांनी सांगितलं होतं की, ‘मां, माटी और मानुष’! पण आज इथं ना मां सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे”, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान अपघातामुळे जखमी झाल्या. त्यांनी भाजपवर आरोप केला. पण तपासात त्यांच्या सुरक्षेत कसूर झाल्यामुळे त्या जखमी झाल्याचं समोर आलं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

ममता बॅनर्जी गप्प का?

तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये भाजपच्या जवळपास 150 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. आमचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते जखमी झाले. पण याबाबत ममता बॅनर्जी बोलायला तयार नाहीत. गरीब, आदिवासी, दुर्लक्षित समाजासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या योजनाही ममता बॅनर्जी यांनी लागू केल्या नाहीत, अशी टीका राजनाथ यांनी केलीय.

Defense Minister Rajnath Singh criticizes West Bengal Chief Minister Mamata Banerjee

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*