Corona Update : चिंता वाढली! मागच्या 24 तासांत 90 हजार रुग्णांची भर, 6 महिन्यांत सर्वात जास्त

Corona Update Over 90,000 patients in last 24 hours, highest in 6 months

Corona Update : देशभरात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे, दररोज संसर्गाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुन्हा एकदा देशभरातून समोर आलेल्या कोरोनातील नवीन प्रकरणांची आकडेवारी जनतेची चिंता वाढवणारी. भारतातील डझनभराहूनही अधिक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा संसर्ग दिसून आला आहे. यासाठी लोकांना खबरदारी घेण्याचे सतत आवाहन केले जात आहे. शुक्रवारी, देशभरात कोरोना संसर्गाची 89,030 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी 19 सप्टेंबर 2020 नंतरची सर्वात मोठी आकडेवारी आहे. यासह देशभरात एकूण रुग्णसंख्या वाढून 1,23,91,140 झाली आहे. Corona Update Over 90,000 patients in last 24 hours, highest in 6 months


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे, दररोज संसर्गाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुन्हा एकदा देशभरातून समोर आलेल्या कोरोनातील नवीन प्रकरणांची आकडेवारी जनतेची चिंता वाढवणारी. भारतातील डझनभराहूनही अधिक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा संसर्ग दिसून आला आहे. यासाठी लोकांना खबरदारी घेण्याचे सतत आवाहन केले जात आहे. शुक्रवारी, देशभरात कोरोना संसर्गाची 89,030 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी 19 सप्टेंबर 2020 नंतरची सर्वात मोठी आकडेवारी आहे. यासह देशभरात एकूण रुग्णसंख्या वाढून 1,23,91,140 झाली आहे.

मागच्या 24 तासांत देशात 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि देशातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या 1,64,162 वर पोहोचली आहे. शुक्रवारी नोंदविण्यात आलेली नवीन प्रकरणे जास्त चिंताजनक आहेत, कारण देशात 16 सप्टेंबर रोजी देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचे सर्वात जास्त 97,860 रुग्ण आढळले होते.

दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशाच्या या दुसर्‍या लाटेमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील दैनंदिन प्रकरणांपैकी 54 टक्के एवढी ही रुग्णसंख्या आहे. सुरुवातीपासूनच आतापर्यंत महाराष्ट्र हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्य राहिले आहे. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे सर्वाधिक 47,827 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत गेल्या 24 तासांत 8,832 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दररोज समोर येणाऱ्या आकडेवारीत राज्याने सलग दुसर्‍या दिवशी नवा विक्रम नोंदविला आहे. आदल्या दिवशी कर्नाटकात 4,991 नवे रुग्ण आणि तिसर्‍या क्रमांकावर छत्तीसगडमध्ये 4174 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहे.

लसीकरण मोहिमेलाही वेग

कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. १ एप्रिलपासून देशभरात 45 वर्षांहून अधिक वर्षे वयाच्या सर्वांना लस देणे सुरू झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताची लसीकरण गती खूप चांगली आहे, कोरोनाची दुसरी लाट रोखण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्रीपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 7,06,18,026 डोस देण्यात आले आहेत.

Corona Update Over 90,000 patients in last 24 hours, highest in 6 months

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात