लसीच्या किंमतीवर चर्चा करणारा भारत कदाचित जगातील एकमेव देश, डी.के. शिवकुमार बरसले


विशेष प्रतिनिधी 

बंगळूर : कोरोनावरील लस साऱ्या जगात मोफत दिली जात असताना किमतीची चर्चा होत असलेला भारत हा कदाचित एकमेव देश असेल, अशी टीका कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी केली.D. K. Shivkaumar lashesh on central govt.

रविवारी त्यांनी ट्विट केले. केंद्रातील भाजप सरकारने लसीची किंमत वाढवून अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर आरोग्याची आणीबाणी निर्माण झाली



असताना नफेबाजीला परवानगी मिळता कामा नये. जनतेच्या कल्याणासाठी टाकलेले एक पाऊल म्हणून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस मोफत मिळावी. कर्नाटकमधील भाजप सरकारने लस मोफत देण्याची घोषणा अद्यापही केली नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली.

लसीकरणाचा तपशील लवकरात लवकर जाहीर केला जावा, अशी मागणी करून ते म्हणाले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर वेगवेगळे असल्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल.

D. K. Shivkaumar lashesh on central govt.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात