वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर भाजपाच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाने हल्ला केला. मात्र त्यात त्यांना इजा झाली नाही. Crowd attack on BJP’s star campaigner wrestler Babita Fogat’s convoy in Meerut
ओवैसी यांच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर आता बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर दबुथुआ गावात जमावाने हल्ला चढवल्याची घटना घडली.
राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, हल्ल्यात त्यांना इजा झालेली नसली तरी या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App