कोव्हिशिल्डच्या डोस मधील अंतराचा केंद्र सरकार घेणार फेरआढावा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्या लोकांना कोव्हिशिल्डचा एकच डोस देण्यात आला आहे अथवा ज्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे, अशा लोकांमध्ये तिची परिणामकारकता कितपत आहे, याची पडताळणी आता सुरु करण्यात आली आहे. त्यावरून दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. Covishield dose schedule will rechecking by govt.



कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे ४ ते ६ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. लशींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी जरी लोकांसाठी दोन डोसमधील अंतर आणखी कमी करणे चांगले असल्याचे सांगितल्यास आणि त्यामुळे ५ ते १० टक्के जरी फायदा होत असेल तर त्यावेळी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे केंद्र सरकारच्या कोविड गटाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दोन डोसमधील अंतर हे बारा आठवड्यांचे ठेवण्यात आल्यास त्याची परिणामकारकता देखील ६५ ते ८८ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले.

Covishield dose schedule will rechecking by govt.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात