आनंदाची बातमी : बुलंदशहरामध्ये कोवॅक्सिनचे उत्पादन; पोलिओ लस बनविणाऱ्या संस्थेत दरमहा दीड कोटी डोस


वृत्तसंस्था

लखनौ : कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा जाणवत आहे. परंतु आता लस तयार करण्यासाठी केंद्र सरकारने बुलंदशहरच्या भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेडला (बीआयबीसीओएल) मान्यता दिली आहे. बीआयबीसीओएलने यासाठी भारत बायोटेकशी करार केला. ऑक्टोबरपासून कोवॅक्सिनचे दीड कोटी डोस दरमहा तयार होतील. Covacin will be produced in Bulandshahar uttar pradesh



सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशनने तीन कंपन्यांना कोवॅक्सिनच्या उत्पादनाची जबाबदारी दिली आहे. ज्यामध्ये बीआयबीसीओएल बुलंदशहराच्या चोला गावात आहे. ही भारत सरकारची एक कंपनी आहे. बीआयबीसीओएल आजवर पोलिओ लस तयार केली आहे. आता कोवॅक्सिन देखील बनविली जाईल. केंद्र सरकारनेही उत्पादनासाठी 30 कोटी बजेट दिले आहे.

पोलिओ लस उत्पादनापैकी 60% कंपनीचा वाटा

देशातील पोलिओ लस उत्पादनापैकी 60% वाटा बीआयबीसीओएलचा आहे. कंपनी दरवर्षी सुमारे 150 कोटी डोसची निर्मिती करते. उत्पादन क्षमता लक्षात घेऊन कंपनीला कोव्हॅक्सिन बनवण्याची जबाबदारी दिली आहे. बीआयबीसीओएल कंपनी ऑक्टोबरमध्ये कोवॅक्सिनचे डोस तयार करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे ही देशी लस तयार केली आहे.

Covacin will be produced in Bulandshahar uttar pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात