International Nurses Day 2021: कोरोना काळातील देवदूत परिचारिका ! द फोकस इंडियाचा सलाम !


  • अहोरात्र न थकता न थांबता प्रसंगी आपले प्राण देऊन…गेल्या दीड वर्षांपासून जगावर आलेल्या महामारीचा सामना या परिचारिका करत आहेत. सलाम यांच्या कर्तुत्वाला International Nurses Day 2021: Angel nurses from the Corona era! Salute from The Focus India!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: डॉक्टरांना देवदूत म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रातील सेवा भावना पाहून याला पवित्र व्यवसाय असेही म्हणतात. वैद्यकीय सरावामध्ये डॉक्टरांसह परिचारिकांची भूमिका देखील खूप महत्वाची मानली जाते, कारण परिचारिका दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या असतात.

हे सत्य हे आहे की रुग्णांची देखरेख काळजी मोठ्या प्रमाणात परिचारिकांवर अवलंबून असते. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना डॉक्टर थोडा वेळ देतात, उर्वरित वेळ, परिचारिकाच त्यांचा आधार असतात. परिचारिकांशिवाय दवाखान्यांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.अशा या देवदूत परिचारिकांना द फोकस इंडियाचा सलाम!

आज 12 मे म्हणजेच जागतिक परिचारिका दिन…सध्या कोरोनाच्या काळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून देशभरातील नर्सने फार मेहनत घेऊन काम केलं.

त्यामुळे आजच्या दिवशी सोशल मीडियावर सर्व नर्सवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

आज फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

फ्लोरेन्स ब्रिटिश तरुणीने सर्वात प्रथम परिचारिका सेवेचे महत्त्व युद्ध काळात त्यांनी सैनिकांची जी सेवा केली. त्यातून जगासमोर आणली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ या पदवीने सन्मानित केले गेलं. म्हणून त्यांचा जन्म दिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

अशातच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील नर्सच्या कामाचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.अभिषेक बच्चनचा खास व्हिडीओ, नर्सेससाठी खास मेसेज लिहीला आहे.“सर्व नर्सेसने माणुसकी जपत तसंच स्वतःचा जीव धोक्यात घालत रूग्णसेवेसाठी अधिकाअधिक वेळ दिला आहे. या परिचारिका दिनानिमित्ताने कोविडशी लढा देण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांना मी अभिवादन करतो. आम्ही नेहमी तुमचे ऋणी राहू.”

महेश बाबुच्या शुभेच्छा

संजय दत्त -“गेल्या काही दिवसांमध्ये, नर्सेस स्वत: भावनिक आणि शारीरिक ताणतणावाखाली असताना देखील रुग्णांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या मी ऐकल्या आहेत. नर्सेस आमच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी मनापासून आभार मानतो.”

सिद्धार्थ मल्होत्रा -“दररोज, आपल्यापैकी बरेच जण घरीच असतात मात्र नर्सेस आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी चोवीस तास काम करतात. त्यांनी नेहमीच रूग्णांच्या कल्याणासाठी काम केलंय. अथक परिश्रम घेत लोकांचा जीव वाचवण्यासाठी खूप आभार…जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा.”

रुग्ण सेवा हाच परिचारिकेचा धर्म… या धर्माचे तंतोतंत पालन करणाऱ्या परिचारिकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरातील अनेक छोट्या-मोठ्या रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान केला जातो.

या देवदूत परिचारिकांची व्यथा

वास्तविक कोरोना ड्यूटी बजावणाऱ्या परिचारिकांना स्वॅब तपासणीनंतर सात दिवसांची पूर्वी विश्रांतीची रजा होती. नंतर ती तीन दिवस केली. तीन महिन्यांत तीन दिवसांची रजाही बंद केली आहे. याशिवाय काही परिचारिका कोरोनाबाधित झाल्यास त्यांना बरे होण्यासाठी जास्त दिवस लागले, तर बिनपगारी रजा घ्यावी लागते. कोरोना बरा होईपर्यंतच्या सात दिवसांची रजा शासनाने द्यावी, अशी शासकीय परिचारिकांची मागणी आहे, तर खासगीत काही वेळा रजेची वेतन कपात केली जाते.

International Nurses Day 2021: Angel nurses from the Corona era! Salute from The Focus India!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण