माणुसकीला काळिमा : वॉर्ड बॉयने काढला ऑक्सीजन सपोर्ट, तडफडून झाला रुग्णाचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद झाली घटना

Corona patient dies after Ward boy removes oxygen support, incident captured on CCTV in Shivpuri Madhya Pradesh

Ward boy removes oxygen support : कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या मध्य प्रदेशातही काळजीचं वातावरण आहे. येथे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे वृत्त नुकतेच काही माध्यमांनी दिले होते. परंतु आता शिवपुरी जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा ऑक्सिजनच्या अभावामुळे तडफडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वॉर्डबॉयने रुग्णाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून तो दुसरीकडे नेला, यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. Corona patient dies after Ward boy removes oxygen support, incident captured on CCTV in Shivpuri Madhya Pradesh


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या मध्य प्रदेशातही काळजीचं वातावरण आहे. येथे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे वृत्त नुकतेच काही माध्यमांनी दिले होते. परंतु आता शिवपुरी जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा ऑक्सिजनच्या अभावामुळे तडफडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वॉर्डबॉयने रुग्णाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून तो दुसरीकडे नेला, यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रुग्णालयाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, रुग्णाची प्रकृती आधीच गंभीर होती, परंतु प्रशासनाचा खोटेपणा सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही स्पष्ट दिसतेय की, सुरेंद्र आपला मुलगा दीपकसह रात्री अकरा वाजता बोलत होते.

यानंतर दीपक निघून गेले व सुरेंद्र झोपायला लागले. यानंतर थोड्या वेळाने वॉर्ड बॉय खोलीत आला आणि सुरेंद्रच्या यांच्या बेडवरून पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर काढून घेतला. यानंतर पहाटे पाचच्या सुमारास रुग्ण सुरेंद्र यांना ऑक्सिजनअभावी त्रास होऊ लागला. यातच तडफडून त्यांचा मृत्यू झाला.

मृत सुरेंद्र यांच्या मुलाने आरोप केलाय की, रुग्णालयात माझ्या वडिलांना कुणीही ऑक्सिजन दिला नाही. सकाळी दीपक सकाळी वॉर्डात पोहोचला, तेव्हा त्याला त्याचे वडील बेडवर तडफडताना दिसते. दीपकच्या म्हणण्यानुसार, वडिलांना स्ट्रेचर न मिळाल्याने त्याने वडिलांना पाठीवर उचलून आयसीयूत नेले, परंतु थोड्या वेळाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवपुरीच्या मेडिकल कॉलेजचे डॉ. अक्षय निगम म्हणाले की, रुग्णाची हिमोग्लोबिन 6 ग्रॅमपर्यंत कमी झाला होता, पण त्याला ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती. म्हणूनच नर्सच्या सांगण्यावरून वॉर्ड बॉयने दुसरा रुग्णाला देण्यासाठी ऑक्सिजन काढून नेला. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम स्थापन करण्यात आली असून दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

Corona patient dies after Ward boy removes oxygen support, incident captured on CCTV in Shivpuri Madhya Pradesh

महत्त्वाच्याा बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात